Home »TV Guide» Porus Actress Suhani Dhanki Got Married To Boyfriend Prathmesh Modi

लंडनचे बिझनेसमन मोदीसोबत विवाहबंधनात अडकली ही अॅक्ट्रेस, थाटात झाला लग्नसोहळा

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 16:02 PM IST

मुंबईः 'पोरस' या टीव्ही मालिकेत प्रिन्सेस लाचीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी धानकी हिचे नुकतेच लग्न झाले आहे. बॉयफ्रेंड प्रथमेश मोदीसोबत सुहानी विवाहबद्ध झाली. सुहानीने लग्नाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन त्यासोबत लिहिले, 'And just like that.. we began our forever ❤️'. लग्नात सुहानीने डार्क पिंक कलरचा लहेंगा परिधान केला होता. प्रथमेश मोदी हे लंडनमधील प्रसिद्ध उद्योगपती आहेत.


लग्नापूर्वी सुहानीची मेंदी आणि संगीत सेरेमनी झाली. मेंदी सेरेमनीत सुहानीने पर्पल कलरचा लहेंगा तर संगीत सेरेमनीत स्काय ब्लू आणि गोल्डन कलरचे कॉम्बिनेशन असलेला डिझायनर ड्रेस घातला होता. संगीत कार्यक्रमात सुहानीने प्रथमेशसोबत ठेका धरला होता. 2016 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.


पाहुयात, सुहानी आणि प्रथमेश यांच्या मेंदी आणि संगीत सेरेमनीचे निवडक फोटोज...

Next Article

Recommended