बॉलिवूडमध्ये आपली कोणतीही ओळख नसलेला पॉवेल गुलाटी 'युद्ध' या टीव्ही मालिकेत
अमिताभ बच्चन साकारत असलेल्या प्रमुख पात्राच्या मुलाची भूमिका करत आहे. पॉवेलला ही भूमिका मिळवण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती.
पॉवेलने सांगितले की, 'जेव्हा कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडांनी मला ऑडिशन देण्यासाठी सांगितले, तेव्हा मी खूप आनंदी झालो होतो. नंतर ही भूमिका दुसर्या अभिनेत्याकडे गेल्याचे मला कळाले. वास्तविक नंतर यामध्ये काही तथ्य नसल्याचे आढळून आले. त्याच रात्री मला, 'अभिनंदन तू बच्चनचा मुलगा आहेस' असा फोन आला. अनुराग कश्यपने माझे ऑडिशन घेतले होते. ते त्यांना आवडलेही होते.' अमिताभ बच्चनसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत पहिल्यांदाच कॅमेर्याचा सामना करण्याचे क्षण आठवत पॉवेल म्हणतो की, 'या संधीने माझ्यासाठी एका नवीन जगाचे द्वार उघडले आहे.'