मुंबई: काल (11 जून) अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा, अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि प्राची देसाई 'झलक दिखला जा' या टीव्ही शोच्या सेटवर दिसले. आपल्या 'एक व्हिलेन' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी शोच्या सेटवर आले होते. शोमध्ये प्राची देसाईने 'एक व्हिलेन'च्या आयटम नंबर 'आवारगी...'वर दमदार परफॉर्मन्स दिला तेव्हा सर्वत्र टाळ्यांचा आवाज घूमत होता.
यावेळी तिन्ही स्टार्सने आपल्या सिनेमाविषयी प्रेक्षक माहिती दिली. प्रेक्षकांच्या अग्रहाखातर सिध्दार्थने किकू शारदासोबत डान्स केला. सिध्दार्थ यावेळी शोचे इतर स्पर्धक कृतिका कामरासह थिरकताना दिसला.
'एक व्हिेलन' एक रोमाँटिक थ्रिलर सिनेमा आहे. एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने त्याची निर्मिती केली असून मोहित सूरीने दिग्दर्शित केला आहे. सिध्दार्थ आणि श्रध्दा अभिनीत हा सिनेमा 27 जून रोजी रिलीज होणार आहे. सिध्दार्थ आणि श्रध्दा व्यतिरिक्त सिनेमनात रितेश देशमुखचीसुध्दा महत्वपूर्ण भूमिका आहे.
पुढील स्लाइट्सवर क्लिक करा आणि पाहा शोमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...