आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांत प्रणितने पहिल्यांदाच केली शेव्हिंग, पाहा 'शकुनी मामा'चे वेगवेगळे LOOKS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रणित भट्ट)
मुंबईः प्रणित भट्टला बघता तो 'बिग बॉस'चा खेळ अतिशय गांभीर्याने खेळत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच प्रणितने दावा केला होता, की जर तो गेल्या आठवड्यात घरातून एलिमिनेट झाला नाही तर आपली दाढी काढुन टाकेल. त्याने आपले म्हणणे खरे करुन दाखवले आहे.
सोमवारच्या एपिसोडमध्ये प्रणित क्लीन शेव्हमध्ये अगदी बदलेल्या अंदाजात सर्वांसमोर आला.
'बिग बॉस'शी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात प्रणितने उपेनला शब्द दिला होता, की जर तो एलिमिनेट झाला नाही, तर आपली शेव्ह क्लीन करेल. गेल्या आठवड्यात प्रणित आऊट झाला नाही आणि सुकिर्तीला घरातून निरोप देण्यात आला. त्यामुळे त्याने दिलेला आपला शब्द पाळला. प्रणितचा हा बदललेला लूक बघून घरातील सर्वच सदस्य चकित झाले आणि त्यांनी त्याच्या इटॅलियन लूकचे तोंडभरुन कौतुक केले. विशेष म्हणजे प्रणितने तीन वर्षांत पहिल्यांदाच शेव्हिंग केली आहे.
श्रीनगर (जम्मू काश्मिर)चा रहिवाशी असलेल्या प्रणितला स्टार प्लस वाहिनीवरील 'महाभारत' या मालिकेतील शकुनी मामाच्या भूमिकेने भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. प्रणितने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रणित भट्टची निवडक छायाचित्रे...