आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Praneet Bhatt Tied The Knot To Girlfriend Kanchan

\'शकुनी मामा\' गर्लफ्रेंडसोबत अडकला लग्नगाठीत, लखनऊचा झाला जावई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- टीव्हीवर प्रसारित होणारी पौराणिक मालिका 'महाभारत'मध्ये शकूनी मामाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला प्रणीत भट नवाबी नगरी लखनऊचा जावई झाला आहे. लखनऊची कंचन शर्मासोबत त्याने बुधवारी (3 नोव्हेंबर) लग्नगाठ बांधली. हे लग्न रात्री लखनऊमध्येच झाले. या लग्नसोहळ्यात दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवास उपस्थित होते. लग्नावेळी प्रणीत सेल्फी मूडमध्ये दिसला.
कंचन शर्मा लखनऊमध्ये एअरपोर्टजवळ राहते. तसेच प्रणीत भट जम्मूचा रहिवासी आहे. बुधवारी रात्री दोघांचे अगदी सामान्य पध्दतीने लग्न झाले. दोघे एकत्र थिएटर करत होते आणि अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले आहे. जम्मूमध्ये 2 नोव्हेंबरपासून लग्नाच्या विधीं सुरुवात झाली होती.
गुरुवारी जम्मूला होणार रवाना-
कंचनचे गुरु आनंद कृष्णन यांना सांगितले, की दोघांनी साध्या पध्दतीने लग्न केले. त्यामध्ये कुटुंबीयांशिवाय काही खास पाहूण उपस्थित होते. दोघे गुरुवारी सकाळी जम्मूला रवाना होणार आहेत.
'बिग बॉस 8'मध्ये दिसला आहे प्रणीत भट-
'महाभारत' मालिकेनंतर मागील वर्षी 'बिग बॉस'च्या आठवड्या पर्वात दिसला होता. येथे पुनीत इस्सर, प्रीतम सिंह आणि गौतम गुलाटीचा P3G ग्रुप चर्चेत राहिला होता. मात्र या ग्रुपमधून सर्वात पहिले एलिमिनेशन प्रणीतचा झाले होते. तो 91 दिवशी 'बिग बॉस'च्या घरात राहिला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रणीतच्या लग्नातील फोटो...