आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Boyfriend Moves Anticipatory Bail Plea At The Dindoshi Sessions Court

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल करू शकतो आत्महत्या, डॉक्टरांनी व्यक्त केलीये भिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला फोटो- प्रत्युषाच्या मृत्यूनंतर रडताना बॉयफ्रेंड राहुल आणि दुसरा फोटो- राहुल आणि प्रत्युषा - Divya Marathi
पहिला फोटो- प्रत्युषाच्या मृत्यूनंतर रडताना बॉयफ्रेंड राहुल आणि दुसरा फोटो- राहुल आणि प्रत्युषा
मुंबई: टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात बॉयफ्रेंड राहुल राज सिंह सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. राहुलने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाची याचिका दाखल केली आहे. याचिकेची सुनावणीवर शुक्रवारी (8 एप्रिल) विचार केला जाईल. राहुलचे नवीन वकील अशोक सरोगी यांनी याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण आजच्यासाठी स्थगित करण्यात आले आहे.
राहुलच्या वकिलांनी सोडली केस...
यापूर्वी राहुलचे माजी वकील नीरज गुप्ता यांनी प्रकरणाशी संबंधित माहिती लपवून ठेवल्याचा राहुलवर आरोप लावून ही केस सोडून दिली. त्यानंतर राहुलने दुसरा वकील ठेवला आहे. गुप्ता यांचे म्हणणे होते, की 'मी या प्रकरणाचा प्रचार करू नये आणि कुणासोबत अन्याय होऊ नये, असे मला वाटले. म्हणून मी ही केस सोडून दिली.' त्यांनी दावा केला आहे, की क्लायंटने वकिलाला सर्व घटना सविस्तर आणि सत्य सांगावे. मग ते सत्य असो अथवा खोटे, चांगले असो वा वाईट. परंतु गुप्ता यांचे म्हणणे होते, की राहुलने त्यांना अंधारात ठेवले आणि मला या घटनेची सर्व माहिती बाहेरूनच जास्त मिळाली.
राहुलच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...
राहुलच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 504, 506 (धमकी देणे), 323 (जाणूनबजून त्रास देणे) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील चौकशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांना शंका आहे, की राहुलचे एका तरुणीसोबत संबंध होते, त्या तणावात प्रत्युषाने आत्महत्या केली.
डॉक्टरांना वाटते, राहुल करू शकतो आत्महत्या...
याचदरम्यान राहुलच्या प्रकृतीविषयी डॉक्टर्ससुध्दा चिंतेत आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की राहुल आत्महत्या करू शकतो. त्यांची मानसिकता ठिक नाहीये. राहुल रविवारपासून (3 एप्रिल) हॉस्पिटलमध्ये आहे. डॉ. संतोष गोयल यांनी सांगितले, की राहुल उदास आहे आणि वारंवार प्रत्युषाचे नाव घेतोय. मी त्याला इतक्यात डिस्चार्ज करू शकत नाही. कारण तो काहीही करू शकतो. त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याला औषधी दिले जात आहेत. परंतु औषधांचा प्रभाव संपल्यानंतर तो हिंसक होतो.
'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिलला गोरेगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दिवशी सकाळी तिचे बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत भांडण झाले होते. राहुलचे दुस-या तरुणीसोबत संबंध होते, अशी प्रत्युषाला शंका होती. या प्रकरणात अनेक खुलासे झाले आहेत. प्रत्युषाच्या आई-वडील आणि फ्रेंड्सने राहुलला तिच्या मृत्यूला जबाबदार ठरवले आहे. तिच्या आई-वडिलांनी राहुलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावून तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषा आणि राहुल यांनी एकत्र घालवलेले क्षण...