आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Complains Of Violence Against Her Boyfriend

'आनंदी'ला बॉयफ्रेंडने केली मारहाण, पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स वाहिनीवरील 'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका करणा-या प्रत्‍युषा बॅनर्जीने बॉयफ्रेंडवर मारहाण केल्‍याचा आरोप लावला आहे. मकरंद मल्‍होत्रा हा तिचा बॉयफ्रेंड असून त्‍याच्‍याविरुद्ध प्रत्‍युषाने ओशिवारा पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, प्रत्‍युषाने मकरंदच्‍या वडीलांवरही आरोप केला आहे. बॉयफ्रेंडला अनेक दिवसांपासून भेटलेली नसल्‍याचा दावा प्रत्‍युषाने केला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वीच दिल्‍लीत तिला मकरंदसोबत एका लग्‍नात स्‍पॉट केले होते.