आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Leave Set Of In Darr Sabko Lagta Hai

तोकडे कपडे पाहून शूटिंग सेटवरून रागाने निघून गेली ही अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आजकालच्या अभिनेत्रींनी तोकडे कपडे परिधान करण्यास मूळीच अडचण नसते. त्या कधीही कुठेही शॉर्ट्स घातलेल्या दिसतात. परंतु एका अभिनेत्रीच्या बाबतीत हे प्रकरण जरा उलटे झाले. सेटवर तोडके कपडे परिधान करायला दिल्यानंतर ती रागाने लालबूंद झाली आणि तिथून निघून गेली. झाले असे, की टीव्ही अभिनेत्री प्रत्यूषी बॅनर्जीला एका शोसाठी पारदर्शक ड्रेस परिधान करायचा होता. मात्र तिने तो ड्रेस पाहताच सेटवर गोंधळ घातला आणि रागाच्या भरात सेटवरून निघून गेली. 'डर सबको लगता' शोच्या शूटिंगवेळी हा प्रकार घडला. प्रत्यूषाची या शोमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून निवड झाली होती. मात्र शूटिंग सुरु होण्यापूर्वीच तिने ड्रेसवरून धिंगाणा घातला.
शोशी निगडीत एका सूत्राच्या सांगण्यानुसार, प्रत्यूषा शोच्या सेटवर पोहोचल्यानंतर तिला हा ड्रेस परिधान करण्यास सांगण्यात आले. आधी ती यासाठी तयार होती, मात्र नंतर तिने नकार दिला.
प्रत्यूषाने ड्रेस परिधान केल्यानंतर स्पष्ट सांगितले, ती या ड्रेसमध्ये कर्म्फटेबल नाहीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, टेस्टदरम्यान तिने असाच ड्रेस परिधान केलेला होता. त्यावेळी तिला ड्रेसविषयी काहीच अडचण नव्हती.
प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रॉडक्शन टीमने हे प्रकरण निपटण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. निर्माता आणि अभिनेत्रीमध्ये काहीच सुरळीत झाले नाही. प्रत्यूषा अखेर शूटिंग सेट सोडून निघून गेली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्यूषाचा यापूर्वीचा हॉट अवतार...