आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Relative Left For Mumbai From Jamshedpur

प्रत्युषाच्या मामाची आहे पानटपरी, आत्महत्येनंतर मुंबईला रवाना झाले कुटुंबीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्यूषाचे मामा दीनानाथ बनर्जी घराखालच्या भागात पानटपरी चालवतात. - Divya Marathi
प्रत्यूषाचे मामा दीनानाथ बनर्जी घराखालच्या भागात पानटपरी चालवतात.
जमशेदपुर (झारखंड): 'बालिका वधु' फेम प्रत्युषा बॅनर्जीचे कुटुंबीयांसोबत तिच्या मामा कुटुंबीयसुध्दा झारखंडमध्ये राहत होते. तिचे मामा आजही पानची दुकान चालवतात. प्रत्युषाच्या आत्महत्याची बातमी कळताच कुटुंबीय आणि आजोळचे सदस्य शुक्रवारी (1 एप्रिल) रात्री उशारी मुंबईकडे रवाना झाले.
शुक्रवारी सकाळी आईसोबत झाले होते बोलणे...
- प्रत्युषाचा जन्म जमशेदपूरच्या सोनारीमध्ये झाला होता. तिच्या आत्महत्याची बातमी कळाल्यानंतर तिच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला.
- - dainikbhaskar.comने प्रत्युषाच्या घरी जाऊन तिच्या नातेवाईकांशी बातचीत केली.
आई आणि आजीसोबत झाले होते बोलणे...
- मुलीच्या आत्महत्येचे वृत्त कळताच वडील शंकर बॅनर्जी आणि आई सोमा बॅनर्जी मुंबईला रवाना झाले.
- आईने सांगितले, की गुरुवारी (31 मार्च) रात्री आणि शुक्रवारी (1 एप्रिल) सकाळी प्रत्युषासोबत बोलणे झाले होते.
- मात्र, त्यावेळी असे काहीस जाणवले नव्हते. एकदा बॉयफ्रेंड राहुलसोबत भांडण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.
- शुक्रवारी राहुलने प्रत्युषाच्या काकांना फोन करून या घटनेची माहिती दिली होती.
- प्रत्युषाची आजी झरना बॅनर्जी यांनी सांगितले, की गुरुवारी जवळपास साडे अकरा वाजता त्या प्रत्युषाला फोनवर बोलल्या होत्या.
आजोळी आहे दु:खद वातावरण...
- प्रत्युषाचे आजोळ जुगसलाई स्टेशन रोडमध्ये जेएसईबी (झारखंड राज्य विद्युत बोर्ड) ऑफिस समोर आहे.
- याच ऑफिससमोर घराच्या वरील भागात तिचे आजोळचे सदस्य राहतात.
- घराच्या खाली तिचे मामा दीनानाथ बॅनर्जी पानची दुकान चालवतात.
- रात्री जवळपास 10 वाजता दीनानाथ दुकान बंद करत होते.
- तेव्हा त्यांना प्रत्युषाच्या आत्महत्येची वार्ता मिळाली. त्यांना प्रत्युषाच्या आत्महत्येविषयी विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, की त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना त्रास देऊ नये.
2014मध्ये भास्करसोबत केली होती बातचीत...
- डिसेंबर 2014मध्ये प्रत्युषा जमशेदपूरला आली होती. dainikbhaskar.comसोबत बातचीत करताना तिने सांगितले होते, 'हो मी खट्याळ आहे. जर दुसरे लोक असा विचार करत असतील तर. मला भट्ट कॅम्पकडून ऑफर आहेत आणि लवकरच सिनेमात दिसणार आहे'
- परंतु तिचे सिनेमांत काम करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. जवळपास एक वर्षांपूर्वी प्रत्युषाने आदित्यपूरमध्ये एक अॅक्टिंग इंस्टिट्युट चालु करण्याची योजना केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा प्रत्युषाविषयी नातेवाईकांनी काय सांगितले...