आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee Was Party Girl, See Some Unseen Instagram Photos

हे PHOTOS सांगतात पार्टी गर्ल होती प्रत्युषा, खासगी आयुष्यात करायची धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बालिका वधू'ची 'आनंदी' अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच तिच्याविषयी धक्कादायक खुलासा झाला आहे. जे.जे. हॉस्पिटलच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे, की प्रत्युषा बॅनर्जी प्रेग्नेंट होती. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की 'बालिका वधू' फेम 'आनंदी' या 24 वर्षांच्या अॅक्ट्रेसने आत्महत्येच्या एक दिवस आधी गर्भपात केला होता.
1 एप्रिलला प्रत्युषाने आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेकांनी ती गर्भवती असल्याचा दावा केला होता. प्रत्युषा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत गोरेगाव स्थित फ्लॅटमध्ये राहत होती. ती आणि राहुल ब-याच दिवसांपासून रिलेशिपमध्ये होते. या प्रकरणात राहुलची चौकशी सुरु आहे.
राहुल करायचा प्रत्युषाला मारहाण...
प्रत्युषा एप्रिलमध्ये साखरपुड्याची तयारी करत होती. 14 एप्रिलनंतर ती आपला प्रियकर राहुलराज सिंहसाेबत लग्नाचा बेत आखत होती. पण राहुल त्यासाठी तयार नव्हता. याच मुद्द्यावरून आत्महत्येच्या आदल्या दिवशी गुरुवारी त्यांचे भांडण झाले होते. शुक्रवारी सकाळीही प्रत्युषाचे आधी राहुलची मैत्रीण सलोनी आणि संध्याकाळी राहुलशी भांडण झाले होते. तिच्या मित्रांनुसार, राहुल अनेकदा प्रत्युषाला मारहाण करायचा. शेजारी अनुज सचदेवाने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्यांनी तिला रडताना पाहिले होते. ती राहुलवर विश्वासघाताचा आरोप करत होती.

प्रत्युषा या नात्याने डिप्रेशनमध्ये गेली होती, असे तिचे कुटुंबीय आणि फ्रेंड्सचे म्हणणे आहे. ती तणावात आयुष्य घालवत होती. प्रत्युषाचा मित्र आणि अभिनेता एजाज खानने सांगितले होते, की 'बिग बॉस'मध्ये मी ज्या धाडसी आणि हसमुख प्रत्युषाला पाहिले होते. ती ही प्रत्युषा नव्हतीच. प्रत्युषाच्या फ्रेंड्स आणि आई-वडिलांचे म्हणणे आहे, की ती खूप हसत-खेळत आयुष्य जगणारी आणि बिनधास्त राहणारी मुलगी होती. तसे पाहता, प्रत्युषा ख-या आयुष्यात पार्टी गर्ल होती. नेहमी आनंदात राहण्याचा ती प्रयत्न करत होती, असे आम्ही नव्हे असे तिचे इंस्टाग्रामवरील फोटो सांगत आहेत.
प्रत्युषाच्या काही इंस्टाग्रामवरील फोटोंवर नजक टाकली तर दिसते, की ती आयुष्याला एन्जॉय करत होती. प्रत्युषाचे पार्टी, एन्जॉय आणि फ्रेंड्ससोबतचे धमाल-मस्तीचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...