आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee\'s Boyfriend Rahul Still Admitted In Hospital

\'आनंदी\'चा बॉयफ्रेंड रुग्णालयातच, म्हणतोय- प्रत्युषा मला बोलवत आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल राज सिंह आणि प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
राहुल राज सिंह आणि प्रत्युषा बॅनर्जी
मुंबई: आनंदी अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह सध्या रुग्णालयात दाखल आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा राहुल शुध्दीवर येतो, तेव्हा तो म्हणतो, की प्रत्युषा त्याला बोलावत आहे. तसेच, त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे, की त्यांचा मुलगा मृत्यूचा दारात आहे. मात्र, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, राहुलच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. राहुलच्या छातीत वेदना होत असून कमी रक्तदाब असल्याने त्याला रविवारी (3 एप्रिल) कांदिवलीच्या साई रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी (4 एप्रिल) त्याला आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
राहुलच्या वडिलांनी प्रत्युषाला म्हटले 'मुलगी'...
- राहुलच्या वडिलांनी मीडियासोबत संवाद साधताना म्हटले, की मुलीसारखी सून गमावल्यानंतर त्यांचा मुलगा मृत्यूच्या दारात आहे.
- राहुलच्या वकिलांच्या सांगण्यानुसार, राहुल नॉर्मल वॉर्डमध्ये असला तरी त्याच्या तब्येतीत सुधार झाला नाहीये. तो प्रत्युषाच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर आलेला नाहीये.
- पोलिसांच्या सांगण्यानुसार, राहुलला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरच चौकशी केली जाईल.
आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये का शिफ्ट केले...
- राहुलच्या वडिलांनी सोमवारी माध्यमांना सांगितले, की डॉक्टर्सनी म्हणाले होते, की जर राहुलला आयसीयूमधून बाहेर काढले नाही तर त्याचे ब्रेन हेमरेज होऊ शकते.
- त्यांनी लोकांना अपील केले आहे, की त्यांच्या मुलाच्या स्वास्थासाठी प्रार्थना करा.
- राहुलचे एक नातेवाईक शयाली चढ्डाने सांगितले, की तो वारंवार प्रत्युषाचे नाव घेतोय. जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो म्हणतो, की प्रत्युषा त्याला तिच्याकडे बोलावत आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राहुल, त्याचे वडील आणि प्रत्युषाचे PHOTOS...