आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Banerjee\'s Boyfriend Rahul Threatens To Jump Off The Hospital Building

स्वत:ला बाथरुममध्ये बंद करून प्रत्युषाचा BF म्हणाला, \'छतावरून उडी मारेल!\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्युषा बॅनर्जी आणि राहुल राज सिंह - Divya Marathi
प्रत्युषा बॅनर्जी आणि राहुल राज सिंह
मुंबई: आनंदी अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राजला सिंह शनिवारी (16 एप्रिल) हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्याला शुक्रवारीच हॉस्पिटमधून बांगुर नगर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्याची दोन तास चौकशी केली. रिपोर्ट्सनुसार, पोलिस स्टेशनमधून परत आल्यानंतर राहुलने स्वत:ला बाथरुममध्ये बंद केले आणि हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारण्याची धमकी दिली.
काय म्हणतात रिपोर्ट्स...
पोलिस स्टेशनमधून परत आल्यानंतर काही मिनिटांनी राहुल बाथरुममध्ये गेला. त्याला जाऊन बराच वेळ झाल्यानंतर लक्षात आल्यानंतर आई-वडिलांना चिंता वाटली. त्यांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी राहुलसोबत बातचीत केली आणि तो काहीवेळाने बाहेर आला. यादरम्यान राहुलले हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारण्याची धमकी दिली होती.
शनिवारीसुध्दा झाली चौकशी...
शनिवारीसुध्दा पोलिसांनी एक तास राहुलची चौकशी केली. त्यानंतर त्याने माध्यमांसोबत संवाद साधला. राहुलने यादरम्यान सांगितले, 'मी निर्दोष आहे. मी प्रत्युषासोबत काहीच चुकीचे केले नाही. कव्हर पाहून पुस्तकावर टिका करू नका. माझ्यासोबत न्याय होईल. मीडिया मार्फत मी
एकच सांगू इच्छितो, की मी कोणताच गुन्हा केला नाहीये.'
राहुलने यावेळी असेही सांगितले, 'मी सर्वकाही विसरण्याचा प्रयत्न करतोय. मला या धक्क्यातून सावरायचे आहे. मी मीडियासोबत संवाद साधेल, परंतु त्यासाठी एक योग्य वेळ येऊ द्या. जे सत्य आहे, ते मी पोलिसांना सांगत आहे. ते मी लोकांसमोरसुध्दा आणेल.'
काय आहे प्रकरण?
'बालिका वधू'मधून आनंदीच्या भूमिकेने लोकप्रिय झालेल्या प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिलला राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. कोकिलाबेन रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर प्रत्युषाचे आई-वडील आणि फ्रेंड्सने राहुलला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले. प्रत्युषाच्या आई-वडिलांनी बांगुर नगर पोलिस ठाण्यात राहुल विरोधात तक्रार दाखल केली. सध्या राहुल अटकपूर्व जामीनावर आहे आणि पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषा आणि राहुलचे PHOTOS...