आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratyusha Was Pregnant, Said Boyfriend Rahul Raj Singh

राहुलची कबूली, \'ते बाळ माझेच\', प्रत्युषाच्या आत्महत्येच्या दिवशी काय घडले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्युषा बॅनर्जी बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत. - Divya Marathi
प्रत्युषा बॅनर्जी बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत.
मुंबई: प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहवर संयशाची तलवार लटकलेलीच आहे. प्रत्युषाच्या गर्भपाताविषयी राहुलने कबूल केले, की प्रत्युषा त्याच्या मुलाची आई होणार होती. मात्र, गर्भपाताचा निर्णय दोघांनी मिळून घेतला आहे. आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने केलेल्या गर्भपातामुळे राहूलवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राहुलने पोलिसांना 1 एप्रिलला काय-काय घडले होते हेदेखील सांगितले.
प्रत्युषाच्या प्रेग्नेंसीविषयी राहुलने काय सांगितले...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी राहुलला प्रत्युषाच्या गर्भपाताविषयी सविस्तर माहिती मागितली.
- राहुलने सांगितले, 'जेव्हा प्रत्युषाने सांगितले, की पीरियड्स मिस होताय, तेव्हा आम्ही प्रेग्नेंसी टेस्टसाठी डॉक्टरांकडे गेलो. त्यानंतर आम्ही गर्भपाताचा निर्णय घेतला. कारण आमचे लग्न झालेले नव्हते, आम्ही केवळ लिविंगमध्ये राहत होतो.'
- 'मी तिला गर्भपातासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. परंतु तिथे खूप उशीर झाल्याने तिने मला तिथून जाण्यास सांगितले.'
- मात्र, दुस-या दिवशी मी पुन्हा त्या डॉक्टरांकडे तिच्यासाठी औषधे आणण्यासाठी गेलो.
- आम्ही आमचे भविष्य लक्षात घेऊन गर्भपाताचा निर्णय घेतला होता, कारण आम्ही नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होतो.
- यादरम्यान पोलिस राहलुची DNA चाचणी करू शकतात.
1 एप्रिलाला काय-काय घडले होते?
- राहुलने सांगितले, 'प्रत्युषा आणि मी कॉमनफ्रेंडसोबत पार्टी केली आणि रात्रभर गप्पा मारल्या.'
- 1 एप्रिल सकाळी 8:30 वाजता आम्ही नाश्ता करायचा विचार केला. जर आम्ही घरातच खाण्यासाठी काही बनवले असते तर हे सर्व घडले नसते.
- मी उठलो तेव्हा प्रत्युषा अंघोळीला गेली होती. त्यानंतर ती पुन्हा ड्रिंक करायला लागली.
- तिला मद्यपान करायची सवय होती. मी तिला विरोध केला आणि जेवण आणण्यासाठी बाहेर गेलो.
- मी परत आलो आणि दाराची बेल वाजवली तर स्वीच ऑफ होती. माझी चावी काम करत नव्हती, कारण डबल लॉक होते.
- मी दार वाजवले, परंतु काहीच प्रतिसाद आला नाही. मी फोन, मेसेज केले.
- मी खाली उतरलो आणि कुलुप दुरुस्त करणा-या व्यक्तीकडून दुसरी चावी बनवण्याचा विचार करत होतो. त्यावेळी आमचा नोकर आला. मी त्याला बाल्कनीतून घराचे दार उघडण्यास सांगितले.
- घरात जाताच प्रत्युषा पंख्याला लटकलेली दिसली. मी धावत तिच्याकडे गेलो आणि तिच्या पायांना खांद्यावर ठेवले.
- कुलुप दुरुस्त करणा-या व्यक्तीने तिची ओढणी कापली. मी तिच्या चेह-यावर पाणी शिंपडले. तिच्या छातीला पम्प केले. तिच्यात श्वास भरण्यासाठी माऊथ-टू माऊथ प्रासेस केले.
- त्यानंतर मी लगेच तिला खाली घेऊन गेलो. मी कारमध्ये तिच्या शेजारीच बसलेलो होतो. तणावात आलो आणि सर्व सिग्नल तोडून रुग्णालयात पोहोचलो.
प्रत्युषाच्या आई-वडिलांनी पोलिसांवर लावले आरोप...
- प्रत्युषाचे कुटुंबीय हायकोर्टात गेले आहेत. याचिकेत प्रत्युषाच्या आईने आरोप लावले आहेत, की आम्ही पोलिसांना सांगितले होते, की प्रत्युषाची हत्या झाली आहे तरीदेखील त्यांनी आत्महत्या असल्याची तक्रार दाखल केली.
- कुटुंबीयांनी कोर्टाकडे मागणी केली, की या प्रकरणाची चौकशी गुन्हेशाखेकडून केली जावी.
- जे जे रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये कन्फर्म झाले आहे, की प्रत्युषा बॅनर्जी प्रेग्नेंट होती. 'बालिका वधू'ची 'आनंदी' अर्थातच 24 वर्षीय प्रत्युषा तीन महिन्यांची प्रेग्नेंट होती.
- तिने 1 एप्रिलला आत्महत्या करून जीवनप्रवास संपवला.
- तिने आत्महत्ये करण्यापूर्वी ओरल पिल घेऊन गर्भपात केला होता.
- परंतु मंगळवारी (19 एप्रिल) संध्याकाळी पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड राहुलची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण आले.
- राहुलच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली. मात्र, त्याच्या अटकेवर 25 एप्रिलपर्यंत स्थगिती आहे.
- प्रत्युषाच्या गर्भपाताच्या बातम्यांविषयी राहुलचे वडील हर्षवर्धन म्हणाले, 'जी मुलगी गेली, तिच्या चरित्र्यावर लोक जे म्हणत आहेत, त्यांनी स्त्रीचा आदर करावा. तिला बदनाम करून चांगले काम करत नाहीये.'
(सोर्स - मीडिया रिपोर्ट्स)
पोलिस आणि राहुल यांच्यात कोण-कोणते प्रश्न-उत्तर झाले, जेजे हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये काय-काय खुलासा झाला, कोण आहे बाळाचा बाप, कसा झाला प्रत्युषाचा मृत्यू, प्रत्युषाने पालकांना का दिले होते 2.5 कोटी रुपये? या प्रश्नांची उत्तरे वाचा पुढील स्लाइड्सवर...