आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Buzz: नाईट क्लबमध्ये मिस्ट्री गर्लसोबत डर्टी डान्स करताना दिसला 'आनंदी'चा BF

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल राज सिंह आणि प्रत्यूषा बॅनर्जी - Divya Marathi
राहुल राज सिंह आणि प्रत्यूषा बॅनर्जी
मुंबई: प्रत्यूषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह शनिवारी (25 जून) रात्री एका नाईट क्लबमध्ये मिस्ट्री गर्लसोबत डर्टी डान्स करताना दिसला. असे आम्ही नाही, मीडिया रिपोर्ट्स सांगत आहेत. रिपोर्ट्सनुसार, राहूलने खूप मद्यपान केलेले होते.
'बालिका वधू' फेम आनंदी अर्थातच प्रत्यूषा बॅनर्जीने 1 एप्रिलला राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. राहूल तिला कोकिलाबेन रुग्णालयात घेऊन गेला होता. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
राहूल म्हणाला होता, 'मी 18 दिवस झोपलो नाही'...
प्रत्यूषाच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी राहूलने एक फोटोशूट केले होते. त्यादरम्यान तो मीडियाला म्हणाला होता. त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. परंतु ते सर्व खोटे आहेत. तो असेही म्हणाला होता, की प्रत्यूषाच्या मृत्यूनंतर 18 दिवस झोपला नव्हता. राहूलने सांगितले होते, की तो प्रत्यूषाला रुग्णालयात सोडून पळून गेला नव्हता. तीन तास तिथे थांबलेला होता. त्याच्या सांगण्यानुसार, पोलिस आणि प्रत्यूषाच्या आई-वडिलांना याविषयी माहिती दिली होती. परंतु राहूलचे सध्याची वागणूक पाहता, तो प्रत्यूषाला विसरला आहे.
फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्सने लावले होते राहूलवर आरोप...
प्रत्यूषा बॅनर्जी आणि राहूल राज सिंह गोरेगाव स्थित 2BHK फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होते. प्रत्यूषाच्या आई-वडिलांनी आणि फ्रेंड्सने आरोप लावला होता, की राहूल तिला रुग्णालयात सोडून पळून गेला होता. इतकेच नव्हे तर, राहूलने प्रत्यूषाला प्रेमात धोका दिला होता, त्यामुळे तिने आत्महत्या केली, असेही आरोप लावले होते.
राहूल म्हणाला होता, 'मजाक करताना झाला अपघात'
फोटोशूटदरम्यान राहूलला विचारण्यात आले होते, की प्रत्यूषाच्या मृत्यूबाबत तो काय विचार करतो. राहूलने सांगितले होते, 'प्रत्यूषा त्या दिवशी खूप दारू प्यायली होती. तो दिवस एप्रिल फूलचा होता, कदाचित प्रेंक करताना अपघात झाला असेल.' कारण राहूल त्यावेळी घरी नव्हता.
सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती जामीनाची याचिका...
सध्या राहूल राज सिंह जामीनावर बाहेर आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने त्याची जामीनाची याचिका फेटाळली होती. याबाबत राहूल म्हणाला होता, 'हा माझ्यासाठी खूप चांगला निर्णय आहे. यामुळे असे सिध्द झाले, की मी काहीच चुकीचे केले नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्यूषा आणि राहूलचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...