आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स सीनचा भडीमार असलेल्या वेब सीरिजने उडवली प्रीतीची झोप, म्हणाली - सर्वप्रथम मला दाखवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेता-निर्माता फरहान अख्तर 'Inside Edge' या नावाने नवीन वेब सीरिज घेऊन येत आहे. या सीरिजचे कथानक इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) च्या पडद्यामागील डीलवर आधारित आहे. यामुळे मात्र आयपीएल टीम किंग्स इलेवन पंजाबची को-ओनर प्रीती झिंटाची झोप उडाली आहे.  रिपोर्ट्सनुसार, सीरीजमध्ये अभिनेत्री ऋचा चड्ढाने आईपीएल टीमच्या मालकिणीची भूमिका साकारली आहे आणि लीगच्या फाऊंडरच्या भूमिकेत असलेल्या विवेक ओबेरॉयसोबत तिचे सेक्स सीन आहेत.

का वाढले प्रीती झिंटाचे टेन्शन
- सीरीजमध्ये ऋचा चड्ढाने साकारलेली भूमिका प्रीतीवर बेस्ड असल्यामुळे प्रीतीची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. 
- यामुळे प्रीतीने फरहान अख्तरला फोन करुन त्याला चांगलेच खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, प्रीतीने फरहानला शोच्या प्रसारणापूर्वी ही सीरीज तिला दाखवण्यास सांगितले आहे.

काय आहे दिग्दर्शकाचे म्हणणे
- सीरिजचे दिग्दर्शक करण अंशुमान यांनी एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, "होय, या सीरिजमध्ये सेक्स सीन आहे. मात्र ही भूमिका प्रीती झिंटाच्या खासगी आयुष्यावर आधारित नाहीये."
- "शिल्पा शेट्टीदेखील आयपीएल टीमची मालकिण आहे. याचा अर्थ ही भूमिका तिच्यावर आधारित आहे, असा होत नाही. या सीरिजमध्ये अल्टरनेटिव रिअॅलिटी दाखवण्यात आली आहे. मात्र सेक्स सीनचा कुणाच्याही खासगी आयुष्याशी तीळमात्र संबंध नाहीये.
- जुलै महिन्यापासून या सीरिजचे स्ट्रीमिंग अमेजन प्राइम व्हिडिओ या यू-ट्यूब चॅनलवर होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, Inside Edge चे काही सीन्स...