आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Promotes ‘Mary Kom’ On ‘Jhalak Dikhhla Jaa’

PICS: 'झलक दिखला जा'च्या मंचावर या अंदाजात माधुरीला भेटली प्रियांका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माधुरी दीक्षितची गळाभेट घेताना प्रियांका चोप्रा)
मुंबई - प्रियांका चोप्रा आपल्या आगामी 'मेरी कोम' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मंगळवारी 'झलक दिखला जा'च्या सेटवर पोहोचली होती. तिचा हा सिनेमा येत्या 5 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे प्रियांका प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीये.
'झलक दिखला जा'च्या सेटवर प्रियांका व्हाइट ब्लेजर, व्हाइट पँट आणि ब्लॅक टी-शर्टमध्ये अवतरली होती. यावेळी तिने सेटवर स्पर्धकांना कसरती करुन दाखवल्या. शिवाय बॉक्सिंगचे पंचसुद्धा लावले. प्रियांकासह माधुरी दीक्षितनेसुद्धा बॉक्सिंगचे पंच लावले. दोघींनी मंचावर एकत्र तालही धरला. यावेळी दोघीही मस्तीच्या मूडमध्ये होत्या.
प्रियांकाचा 'मेरी कोम' हा सिनेमा बॉक्सर मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित आहे. उमंग कुमार यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून संजय लीला भन्साळी याचे निर्माते आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'झलक दिखला जा'च्या सेटवर पोहोचलेल्या प्रियांकाची खास छायाचित्रे...