आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka, Ranveer, Arjun Break Into Kapil Sharma’S Household

प्रियांकाला समोर बघताच कपिलचे उडाले होश, पाहा \'कॉमेडी नाइट्स\'मधली \'गुंडे\' टीमची मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या आगामी 'गुंडे' या सिनेमाची स्टारकास्ट अर्थातच प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर सध्या आपल्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. याच निमित्ताने हे तिघे अलीकडेच कपिल शर्माच्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या सेटवर आले होते.
यापू्र्वी या तिघांनी 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवर आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत भरपूर धमाल मस्ती केले. तर 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवरचाही या तिघांचा परफॉर्मन्स बघण्यासारखा होता.
एकीकडे प्रियांकाने 'गुंडे'मधील 'अस्सलाम ए इश्कम' या गाण्यावर ताल धरला, तर दुसरीकडे अर्जुन आणि रणवीर चक्क एका गाडीवर स्वार होऊन सेटवर पोहोचले. या दोघांनी कपिलसह बरीच धमाल केली. यानंतर होस्ट कपिल शर्माने प्रियांकाला कॅबरे परफॉर्मन्स देण्याची विनंती केली. प्रियांकाने कपिलची विनंती मान्य करत डान्स केला आणि प्रेक्षकांच्या वाहवाह मिळवली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कॉमे़डी नाइट्स विथ कपिलच्या सेटवरील गुंडे सिनेमाच्या स्टारकास्टची धमाल मस्ती दाखवत आहोत. पु़ढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कशी धमाल केली या स्टार्सनी...