आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून्या टीमसोबत परतला कपिल, समोर आला \'द कपिल शर्मा शो\'चा Promo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा... - Divya Marathi
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा...
मुंबई: कपिल शर्माच्या \'द कपिल शर्मा\' या नवीन कॉमेडी शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. 45 सेकंदाच्या या प्रोमोमध्ये कपिल शर्माशिवाय सुमोना चक्रवर्ती, कीकू शारदा, सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर, अली असगर सर्व ब्लॅक सुटमध्ये एअरपोर्टच्या रनवेवर बिनधास्त वॉक करताना दिसत आहेत. मात्र एअरपोर्टवर असूनदेखील हे सर्वजण हेलिकॉप्टर नव्हे ऑटोरिक्षाची मजा लुटताना दिसत आहेत. 
 
सिध्दू म्हणाले, \'मै दिल मे आता हू\'...
प्रोमोमध्ये कपिलच्या जूनी टीमचे सर्व सदस्य दिसत आहेत. त्यामध्ये नवजोत सिंह सिध्दू म्हणताय, \'मै समझ मे भी आता हू और दिल मे भी, तुम लोक रिक्षा से निकलो भाई, मै हेलिकॉप्टर से आता हू.\' त्यानंतर कपिल अँड टीम ऑटोमध्ये बसून निघून जातात. 
 
कपिलची टक्कर कृष्णासोबत...
कपिलचा हा नवीन कॉमेडी शो 23 एप्रिलला लाँच होणार आहे. हा शो शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर टेलिकास्ट केला जाणार आहे. याचवेळेच कृष्णा अभिषेकचे \'कॉमेडी नाइट्स बचाओ\' आणि \'कॉमेडी नाइट्स लाइव्ह\' हे दोन्ही शो कलर्सवर टेलिकास्ट होतात. येत्या काळात कपिल आणि कृष्णामध्ये टक्कर होताना दिसणार आहे. 
 
का बंद पडला \'कॉमेडी नाइट्स...\'
\'कॉमेडी नाइट्स विथ कपिल\' जानेवारीच्या शेवटी ऑफएअर झाला. परंतु याचा शेवट वादाने झाला. चॅनल आणि कपिल यांच्यात खटके उडाले होते आणि दोघांनी एकमेकांना दोषी ठरवले. कपिलचे म्हणणे आहे, की चॅनलने \'कॉमेडी नाइट्स विथ कपिल\'च्या कॉन्सेप्टवर \'कॉमेडी नाइट्स बचाओ\' हा दुसरा शो सुरु करून त्याचा शो बंद करण्यास हतबल केले. तसेच चॅनलच्या सांगण्यानुसार, कपिल स्टारडम सांभाळू शकला नाही. कलर्सने शोचे सर्व एपिसोड यू-ट्यबवरून डिलीट केले आहेत.
   
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंमधून पाहा, \'द कपिल शर्मा शो\'च्या प्रोमोची खास झलक...