(पुनीत इस्सर)
मुंबई: '
बिग बॉस'च्या घरात मिनिषा लांबा आऊट झाल्यानंतर कालच्या (4 नोव्हेंबर) एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मोठा ड्रामा पाहायला मिळाला. गेममध्ये आतापर्यंत मजबूत स्पर्धक पुनीत इस्सर या आठवड्यात होणा-या एलिमिनेशन अगोदरच घराबाहेर पडला आहे.
अलीकडेच, लग्जरी बजेट टास्कदरम्यान पुनीतने आर्य बब्बरवर शारीरिक ताकदीचा वापर केला. 'बिग बॉस'च्या घराचा नियम-कायद्यानुसार, हाऊसमेट्स
आपसात हाथापाई करू शकत नाही. याच नियमा अंतर्गत पुनीतला घराबाहेरचा रस्ता दाखवला.
त्यानंतर गौतम आणि प्रीतम यावर चर्चा करताना दिसले. गौतम 'बिग बॉस'च्या निर्णयाने उदास दिसला. मात्र, प्रीतम गौतमला समजावताना दिसला, की यात 'बिग बॉस'चा निर्णय चुकीचा नसून पुनीतची चुक आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या घरातील पुनीत इस्सरचा प्रवास...