आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Puneet Issar Playing Game In Big Boss House, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Boss Analysis: शकुनी मामाची सटकली, पुनीतचे नियोजन असेल हटके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुं‍बई - आजचा (शुक्रवारी) पाचवा दिवस 'बिग बॉस'मध्‍ये भावनांनी भरलेला होता. सिक्रेट सोसायटीच्या एका सदस्याला निरोप आणि वाढदिवसानिमित्त आईचा आलेला संदेश या घटना घडल्या. पाचव्या दिवसाच्या एपिसोडला आमच्याकडून 3.5 स्टार्स आऊट ऑफ फाइव्ह...

किचन वॉरपासून प्रणित झाला किचन किंग
बिग बॉसच्या घरातील किचनमध्‍ये प्रत्येक दिवशी संघर्ष होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून किचनमध्‍ये डिआंड्रा आणि करिष्‍माने ताबा मिळवला. आता त्यात प्रणितचाही समावेश झाला आहे. तो शांततेने खेळत आहे. डिआंड्रा, करिष्‍मा आणि आर्य बब्बर पुढे प्रणितचा वाढत चाललेला प्रभाव किती दिवस राहिल हे पाहणे उत्सुकतेचा विषय राहणार आहे.

शकुनी मामाची सटकली
शकुनी ऊर्फ प्रणितला स्वत:च्या वाढदिवसाप्रसंगी ड्रेस मिळाले. पण ते होते शकुनी मामाचे. सिक्रेट सोसायटीने अशी परिस्थिती निर्माण केली होती की प्रणितची सटकली.

सुशांत शोधतोय बहीण
सुशांत दिग्विकर वीक बेब्स ब्रिगेडच्या मदतीने झटके देण्‍याचा प्रयत्न करेल. लगे रहो मुन्नाभाई. पण त्याच्या वागणुकीने बिग बॉसमधील मुली गोंधळलेल्या आहेत.

उतावळा आर्य बनला लक्ष्‍य
आर्य बब्बर उचलगिरी करण्‍यात पटाईत असल्याचे शोच्या सुरुवातीपासूनच स्पष्‍ट झाले. पुनीत इस्सार आल्याने आपण किती आनंदी झालो आहोत हे त्याने यावेळी दाखवले.

पुनीतचे नियोजन..
पुनीत इस्सर यांनी पाचव्या दिवशी सिक्रेट सोसायटीतून घरात प्रवेश केला आहे. सोसायटीत असताना त्यांनी या घरातील सदस्यांचे बारकाईने निरीक्षण केले आहे. भविष्‍यात ते सदस्यांबाबत काय करतात हे भविष्‍यातच कळेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा इतर छायाचित्रे...
हे पण वाचा...