मुंबई - जमशेदपूरच्या अनामिका मजुमदार गेल्या काही दिवसांपासून केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकल्याने चर्चेत आहे. सोमवारी त्यांचा एपिसोड टीव्हीवर टेलिकास्ट झाला. या एपिसोडमध्ये बिग बींनी त्यांना 14 प्रश्न विचारले. सोमवारचा एपिसोड संपेपर्यंत सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देत अनामिका यांनी 50 लाख रुपये जिंकले. मंगळवारच्या एपिसोडमध्ये त्यांना एक कोटींचा प्रश्न विचारला जाईल. पण त्यांनी एक कोटी जिंकले असल्याचे प्रिकॅपमध्ये दाखवले आहे.
सोशल वर्कर आहेत अनामिका...
- अनामिका जमशेदपूरच्या साकचीमधील न्यू बाराद्वारीमध्ये राहतात. सोशल वर्कर असलेल्या अनामिका 'फेथ इन इंडिया' नावाने एक एनजीओ चालवतात.
- अनामिका जेव्हा एनजीओशी संलग्न नव्हत्या, तेव्हाही त्या गरीब मुलांसाठी काहीतरी करायच्या. त्या चांगल्या डान्सरही आहेत.
- 'केबीसी' मध्ये अनामिका 7 कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या होत्या. पण त्यांनी फार रिस्क न घेता. गेम क्विट करणे योग्य समजले. त्यामुळे त्या एक कोटी जिंकल्या.
- अनामिका यांच्याआधी 'केबीसी 9' मध्ये हरियाणाचे वीरेश चौधरी यांनी सर्वाधिक 50 लाख रुपये जिंकले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोमवारी अनामिका यांना 'केबीसी'मध्ये विचारलेले 14 प्रश्न आणि त्यांनी त्याची दिलेली योग्य उत्तरे...