Home »TV Guide» Questions Asked By Amitabh Bachchan To Meenakshi Jain In KBC 9

KBC 9: 10वी पास महिला पहोचली 1 कोटींच्या प्रश्नापर्यंत, दिली 14 प्रश्नांची योग्य उत्तरे

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 16:49 PM IST

मुंबई - कौन बनेगा करोडपतीमध्ये गेल्या आठवड्यांत विक्रम झाला. अनामिका मुजुमदार यांनी एक कोटी रुपये जिंकल्यानंतर त्यांच्यानंतरच्या महिला कंटेस्टंट मिनाक्षी जैनही एक कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. पण योग्य उत्तर माहिती नसल्याने त्यांनी गेम क्विट केला. फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या मिनाक्षी यांनी ज्याप्रकारे समजुतदारपणे आणि वेगाने उत्तरे दिली त्यामुळे अमिताभ यांच्याबरोबरच स्टुडिओ ऑडियन्सनेही त्यांचै कौतुक केलेल. मिनाक्षी यांनी 14 प्रश्नांची योग्य उत्तरे जिंकत 50 लाख रुपये जिंकले.

मुंबईत राहतात मिनाक्षी
- मिनाक्षी यांचा जन्म कुंडा, राजस्थान मध्ये झाला आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या मिनाक्षी लग्नानंतर मुंबईत शिफ्ट झाल्या.
- मिनाक्षी यांच्या मते त्यांच्या समाजात एकदा लग्न केल्यानंतर मुलीला परत लग्न करता येत नाही. त्यांच्या बहिणीला वैवाहिक जीवनात अडचणी आल्याने ती पतीपासून वेगळी झाली. पण त्यामुळे समाजाने त्यांच्या वडिलांना वाळीत टाकले.
- त्यांच्या समाजात मुलांना जो सन्मान मिळतो तो मुलींनाही मिळावा असे मिनाक्षी 'केबीसी'मध्ये म्हणाली.
- वडिलांनी त्यांच्या अंत्य संस्कारात मुखाग्नी देण्याचा अधिकार द्यावा अशी इच्छाही तिने व्यक्त केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मिनाक्षी यांना केबीसीमध्ये विचारण्यात आलेले 15 सवाल...

Next Article

Recommended