आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Quotes Of Television Personalities On Mumbai Gang Rape Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MUMBAI GANG RAPE: 'रेपिस्ट'ला भरचौकात नपुंसक बनवायला हवं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत गुरुवारी 22 वर्षीय महिला फोटोजर्नलिस्टवर पाच जणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी सहा-साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. रात्री आठच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वीस टीम बनवल्या. या प्रकरणात आत्तापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो वीस वर्षांचा आहे. सर्व आरोपींची ओळख पटली आहे. हे आरोपी घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरातील रहिवाशी आहेत. .

महिलांसाठी सुरक्षित समजली जाणा-या मुंबईत महिला पत्रकाराबरोबर झालेल्या गँगरेपनंतर संपूर्ण देशातून आक्रोश व्यक्त केला जातोय. या घटनेचे राजकारणातही पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आर.आर.पाटील यांना बांगड्या पाठवण्याचे लोकांना आवाहन केले आहे.

याप्रकरणी मनोरंजन क्षेत्रातूनही संताप व्यक्त केला जातोय. काही सेलिब्रिटींनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा... करण टाकर, अंकिता शर्मा, सृतित झाल. रुपल त्यागी या कलाकारांसह इतर टीव्ही सेलिब्रिटींनी मुंबई गँगरेपवर व्यक्त केला संताप...