आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट आहे राहुल महाजनची Ex-Wife, पतीसोबत असे दाखवले बेबी बंप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती रोहित रॉयसोबत डिम्पी गांगुली - Divya Marathi
पती रोहित रॉयसोबत डिम्पी गांगुली
मुंबई: राहुल महाजनची पूर्वाश्रमीची पत्नी डिम्पी गांगुली आई होणार आहे. ही माहिती स्वत: डिम्पीने सोशल मीडियावर दिली आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसत आहेत. या फोटोमध्ये तिचा पती रोहित रॉयसुध्दा आहे. फोटोसोबत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.
काय लिहिले डिम्पीने...
डिम्पीने फोटोसोबत लिहिले, 'एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी आम्ही नेहमीसाठी आम्ही एकमेकांच्या आयुष्यात आलो. त्याच्या काही दिवसांपूर्वी मला वाटत होते, की मी सर्वकाही गमावले. तेव्हा तू आलास आणि माझा हात धरलास. तेव्हा कुठे वाटल की मला सर्वकाही मिळाले. जे मला हवे होते ते सर्वकाही मिळाले. देवाचे आभार मानते, की त्याने तुला माझ्याकडे पाठवले. माझा गार्जिअन एंजेल, माझा लकी चार्म्स, माझा बेस्ट फ्रेंड. परंतु आज मी तुचे आभार मानते. मी तुला सांगू शकत नाही, की तू मला किती आनंद आणि सुख दिले आहे. तुला खूप सारे प्रेम आणि हॅप वन ईअर बेबी.'
मागील वर्षी झाले डिम्पीचे दुसरे लग्न...
राहुल महाजनसोबत घटस्फोट झाल्यानंतर डिम्पीने मागील वर्षी 27 नोव्हेंबरला दुबईचा बिझनेसमन रोहित रॉयसोबत दुसरे लग्न केले. हा लग्नसोहळा तिचे होमटाऊन कोलकात्यात झाला. डिम्पीने लग्नात पिंक कलरचा ड्रेस परिधान केलेला होता.
'बिग बॉस 8'मध्ये दिसली होती डिम्पी...
डिम्पी गांगुली 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या आठव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. या सीझनमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती राहुल महाजनसुध्दा सहभागी झाला होता. त्यावेळी दोघांची पुन्हा जवळीक वाढली होती. 2010मध्ये लग्नगाठीत अडकल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी अर्थातच 2013मध्ये राहुल आणि डिम्पी वेगळे झाले होते. त्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रोहित रॉयसोबत डिम्पीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...