रांची: 'बालिका वधू'ची 'आनंदी' अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी राहुल राज सिंहची आई शिवानी सिंह यांनी सोमवारी (13 जून) राज्य महिला आयोग कार्यलयात आल्या होत्या. त्यांनी 5 पानांना जबाब सोपवला. शिवानी म्हणाल्या, 'प्रत्युषा या राज्याची मुलगी असेल तर माझा मुलगासुध्दा झारखंडची मुलगा आहे. प्रत्युषाच्या आयुष्यात राहुलपूर्वी अनेक
तरुण येऊन गेलेत.'
प्रत्युषाच्या आईच्या प्रश्नांवर शिवानी यांची उत्तरे...
- शिवानी यांनी सांगितले, की राहुलला वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्युषाच्या आई-वडिलांनी दोन लाख रुपये का दिले, यामागे काहीतरी कपट असेल.
- सलोनी शर्मा (सलोनी राहुलची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले जाते) राहुल शर्माची बिझनेस पार्टनर आहे. सलोनीला का बदनाम केले जात आहे.
- प्रत्युषाच्या आयुष्यात राहुल येण्यापूर्वी अनेक तरुण येऊन गेलेत. राहुल तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी तिचे बँक अकाऊंट शोमा आणि शंकर बॅनर्जी (आई-वडील) यांच्यासोबत होते. प्रत्युषाच्या नावावर खासगी फायनान्सरचे लाखो रुपयांचे कर्ज होते.
- प्रत्युषाचे वेगळे बँक अकाऊंट नव्हते. राहुलनेच तिचे वेगळे बँक अकाऊंट ओपन केले होते. अकाऊंट ओपन करण्यासाठी लागणारी रक्कमसुध्दा राहुलच्याच खात्यातून कट झाली होती. अशी महाराष्ट्र पोलिसांकडे माहिती आहे.
- 'पावर कपल' या मालिकेतून दोघांना मिळालेल्या रकमेपैकी 99% रक्कम राहूलने प्रत्युषाला दिली होती. जेणेकरून ती तिचे कर्ज फेडू शकेल. याची माहितीसुध्दा महाराष्ट्र पोलिसांकडे आहे.
- राहुल आणि प्रत्युषाच्या शेवटच्या कॉलवरच राहुलला जामीन मिळाला. या कॉलमध्ये राहुल तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्यावेळी प्रत्युषा नशेत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषाचे फोटो...