आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raja Choudhary Ties A Knot With Delhi Based Friend Shveta Sood

PHOTOS: श्वेता तिवारीचा पहिला नवरा राजा चौधरीने केले दुसरे लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राजा चौधरी पत्नी श्वेता सूदसोबत)

मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीतील वादग्रस्त अभिनेता आणि 'बिग बॉस'च्या दुस-या पर्वाचा स्पर्धक राजा चौधरीने श्वेता सूद नावाच्या तरुणीसोबत गुपचुप लग्न थाटले. श्वेता दिल्लीची रहिवासी असून एका कंपनीत ह्युमन रिसोस प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहे. राजाने आपल्या लग्नाची बातमी सोशल नेटवर्किंग साइटवरुन दिली.
राजा चौधरीचे हे दुसरे लग्न आहे. 1998मध्ये टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते, मात्र 2007मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांची एक मुलगी असून तिची कस्टडी श्वेता तिवारीकडे आहे. राजासोबत घटस्फोटानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत 2013मध्ये दुसरे लग्न केले.
योगायोग म्हणजे राजा चौधरीच्या दुस-या पत्नीचे नावसुद्धा श्वेता आहे. लग्नाविषयी राजा चौधरीने सांगितले, की माझे आईवडिल माझ्या लग्नाविषयी चिंतित होते. मी पुन्हा लग्न करावे, अशी त्यांची इच्छा होती. श्वेता सूद खूप क्यूट आणि समजूतदार आहे.
राजाने आपल्या लग्नाची काही छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा राजा-श्वेताच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...