आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये \'आप की अदालत\', बघा छायचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये नवनवीन सेलिब्रिटीचे आगमन होत असते. हे सेलिब्रिटी पाहूणे म्हणून कमी आणि आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जास्त येतात. तसेच काही स्टार्स कपिलच्या शोमध्ये आपल्या अंदाजाने प्रेक्षकांना लोटपोट हसवण्यासाठीसुध्दा येतात.
यावेळी या क़ॉमेडी शोमध्ये स्वत:ला जनतेचे वकिल मानणारे प्रसिध्द पत्रकार रजत शर्मा यांनी उपस्थिती लावली. कपिलप्रमाणेच रजत हेसुध्दा आपल्या 'आप की अदालत' या लोकप्रिय कार्यक्रममध्ये मुलाखती घेतात. परंतु त्यांचा मुलाखती घेण्याचा अंदाज कपिलपेक्षा खूप वेगळा आहे. रजत शर्मा यांनी बॉलिवूडपासून ते राजकिय क्षेत्रापर्यंतच्या अनेक प्रसिध्द व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतल्या आहेत. रतज हे एक पत्रकार आणि अँकर म्हणून ओळखले जातात.
ते जेव्हा कपिलच्या शोमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी तिथेसुध्दा आपल्या लोकप्रिय कार्यक्रमाला सुरूवात केली. परंतु यावेळी त्यांनी कपिलला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. त्यांनी कपिलवर प्रश्नांचा भडिमार केल्याने तो त्यांच्या प्रश्नावर पूर्णत: शांतच झाला.
कॉमेडी शोमध्ये रजत शर्मा यांच्यासह कपिलची दादी आणि बुआनेसुध्दा नेहमीप्रमाणे आपला अंदाज दाखवला. रजत शर्मा यांनी कपिलच्या दादीलासुध्दा आरोपीच्या पिंज-याच उभे करून मुलाखत घेतली. परंतु दादीने आपल्या बिनधास्त अंदाजात रजत यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले.
कपिलच्या कॉमेडी शोमध्ये पोहोचलेल्या रजत शर्मा यांच्या एपिसोडचे लवकरच प्रसारण केले जाईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कपिलच्या कॉमेडी शोमध्ये पोहोचलेल्या रजत शर्मा यांची काही छायाचित्रे...