आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajat Tokas Of Jodha Akbar Engaged To Shrishti Nayyar

'जोधा'च्या 'अकबर'चा गर्लफ्रेंड सृष्टीसोबत साखरपुडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेलिव्हीजनवर प्रसारित होणा-या 'जोधा अकबर' या लोकप्रिय मालिकेतील अकबर अर्थातच रजत टोकसने आपली गर्लफ्रेंड सृष्टी नैयरसोबत साखपुडा केला आहे. दिर्घकाळापासून दोघांचे प्रेमसंबंध होते.
साखरपुड्याचा कार्यक्रम काल (9 एप्रिल) मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिकासुध्दा छापण्यात आल्या होत्या. रजतने साखरपुडा झाल्यानंतर टि्वट करून सांगितले, 'आम्ही दोघे गेल्या एक वर्षापासून एकमेकांना ओखळत असून डेटिंग करत आहोत. सृष्टीने शोच्या शुटिंगदरम्यान माझ्यासोबत बराच वेळ घालवला आहे.'
या जोडीच्या संबंधीत एका सुत्राने सांगितले, 'दोघे एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. मागील काही दिवसांपासून ते साखरपुड्याचे प्लॅनिंग करत होते. रजतने साखरपुड्याच्या दिवशी शोची शुटिंग लवकर आटोपून सुट्टी घेतली होती. यांचे लग्न यावर्षीच्या शेवटपर्यंत होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका आणि या जोडीची फेसबुकवरील काही खासगी छायाचित्रे...