आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'प्यार का दर्द है मीठा-मीठा\'मध्ये राजीव खंडेलवालची एन्ट्री, जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- छोट्या पडद्यावरील 'प्यार का दर्द है मीठा-मीठा' या लोकप्रिय मालिकेत लवकरच अभिनेता राजीव खंडेलवालची एन्ट्री होणार आहे. मात्र या मालिकेतील त्याची एन्ट्री कायमची नसून तात्पुरती आहे. या मालिकेत तो एखादी भूमिका साकारणार नसून आपल्या आगामी 'सम्राट अॅण्ड कंपनी' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावणार आहे.
या कौटुंबिक मालिकेत एका पार्टी सिक्वेन्सदरम्यान राजीवची एन्ट्री खासगी इन्व्हेस्टिगेटर सम्राटच्या रुपात होणार आहे. यावेळी तो आदित्य आणि पंखुडीच्या अडचणी दूर करताना दिसेल.
'सम्राट अॅण्ड कंपनी' हा सिनेमा राजश्री प्रॉ़डक्शनची निर्मिती असून ही मालिकासुद्धा याच बॅनरची आहे. त्यामुळे राजीवला आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी चांगले माध्यम मिळाले.
'सम्राट अॅण्ड कंपनी' हा सिनेमा कौशिक घटक यांनी दिग्दर्शित केला असून राजीव डिटेक्टिव्हची भूमिकेत आहे. राजीवसह मदालसा शर्‍मा आणि गोपाल भट्ट यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या 25 एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'प्यार का दर्द है मीठा-मीठा' या मालिकेच्या सेटवर क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...