आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरमीत-निकितनचा पराभव करून रजनीश बनला 'खतरो का खिलाडी', पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: मॉडेलपासून ते अभिनेत्यापर्यंत असा प्रवास पार करणारा रजनीश दुग्गल 'फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडी-5' या टीव्ही शोचा विजोता म्हणून घोषित झाला आहे. शोचा फायनल एपिसोड रविवारी (25 मे) प्रसारित झाला. रजनीशव्यतिरिक्त गुतमीत चौधरी आणि निकितन धीरसुध्दा फायनलमध्ये पोहोचले होते. परंतु शेवटच्या फेरीत रजनीशने बाजी मारली.
प्रत्येक स्टंट आपल्या शानदार परफॉर्मन्सने रजनीशने केवळ सह-स्पर्धकांचेच नव्हे तर होस्ट रोहित शेट्टीचेसुध्दा मन जिंकले होते. फायनल एपिसोडमध्ये 'सिंघम' अर्थातच अजय देवगण अवर्जुन उपलस्थित होता. अजयने शोचा विजेतेच्या रुपात रजनीशचे नाव घोषित केले आणि त्याला ट्रॉफी दिली.
रजनीशला ट्रॉफी व्यतिरिक्त रोख 25 लाख रुपये आणि स्कॉर्पियो बक्षिस म्हणून देण्यात आले. एका अ‍ॅथलिट्स कुटुंबातली रजनीशने 'खतरो के खिलडी' शोपूर्वी बॉलिवूडमध्ये '1920' (2008), '', 'फिर' (2011), 'डेंजरस इश्क' (2012), 'सम्राट एंड कंपनी' (2014)मध्ये काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा शोवेळी क्लिक केलेली छायाचित्रे...