आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉमेडी नाइट्स...'च्या राजूने लुधियानात थाटले लग्न, नंदिनीसोबत घेतल्या सप्तपदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदनप्रभाकर आणि नंदिनी टंडन
लुधियानाः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये 'राजू' हे पात्र साकारणारा विनोदवीर चंदन प्रभाकर नुकताच लग्नगाठीत अडकला. नंदिनी टंडनसोबत चंदन विवाहबद्ध झाला. सोमवारी लुधियानातील ग्रॅण्ड मॅरिएट हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत चंदनने नंदिनीसोबत सप्तपदी घेतल्या. चंदन मुळचा अमृतसर येथील भल्ला कॉलनी छेहारटा येथील रहिवासी आहे.
लुधियानातून पोहोचला मुंबईतः चंदन प्रभाकरचे लुधियानासोबत जुने नाते आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2005-07 या काळात येथील कंपनीत तो कामाला होता. नंतर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला. येथे बराच संघर्ष केल्यानंतर 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये त्याला राजू हे पात्र साकारण्याची संधी मिळाली.
दहा पंजाबी आणि दोन बॉलिवूड सिनेमांमध्ये कामः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या चंदनने दहा पंजाबी आणि दोन बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोद्वारे त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये तो फस्ट रनरअप ठरला होता. मात्र कपिल शर्माच्या शोने त्याला खरी ओळख मिळवून दिली.
पुढे पाहा, चंदन आणि नंदिनीच्या लग्नाची खास छायाचित्रे..