आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KBC 9: बीडच्या ऊसतोड कामगाराच्या मुलाने जिंकले 25 लाख, थोडक्यात हातून गेले 50 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'कौन बनेगा करोडपती'मध्ये मुंबईचे एक शिक्षक राजूदास माणिक राठोड यांनी 25 लाख रुपये जिंकले. त्यांनी 13 प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली आणि 14 व्या प्रश्नावर गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचे कारण म्हणजे उत्तराबाबत त्यांना खात्री नव्हती. पण त्यांनी हा प्रश्न खेळून त्याने उत्तर दिले असते तर ते नक्की 50 लाख रुपये जिंकले असते. गेम क्विट केल्यानंतर अमिताभ यांनी जेव्हा त्यांना औपचारिकता म्हणून एक पर्याय निवडण्यास सांगितले तेव्हा राजू यांचा अंदाज अगदी योग्य ठरला. 

आई-वडील होते ऊसतोड कामगार.. 
- राजूदास यांनी 'केबीसी' दरम्यान सांगितले की, ते बंजारा समुदायाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यांत ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. राजूदास यांचे आई वडीलही ऊसतोड कामगारच होते. त्यामुळे त्यांना लहानपणी आई-वडिलांचे पुरेसे प्रेम मिळू शकले नाही. त्याचे कारण म्हणजे आई वडील घरातील म्हाताऱ्या लोकांकडे मुले ठेवून ऊस तोडण्यासाठी जात होते. 
- राजूदास यांचे म्हणणे आहे की, शिक्षणामुळे ते यातून बाहेर पडले आणि आज एक शिक्षक आहेत. पण त्यांचे बहुतांश मित्र दहावीच्याही पुढे शिकू शकले नाही आणि आजही ते उसतोडीचे काम करतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राजूदास राठोड यांना 'केबीसी' दरम्यान विचारलेले 14 प्रश्न... 
बातम्या आणखी आहेत...