आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 वर्षांत इतका बदलला राम कपूरचा लूक, पाहा या TV स्टार्समध्ये झालेला कमालीचा बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेता राम कपूर)
टीव्ही अभिनेत्यांचे चेह-यात थोडाही बदल झाला, की चर्चा सुरु होतात. 1997मधील 'न्याय' या मालिकेतून अभिनय करिअरला सुरुवात करणारा राम 15 वर्षांनंतरही टीव्ही इंडस्ट्रीचा एक चर्चित चेहरा आहे. आज राम कपूर 41 वर्षांचा झाला आहे. 1 सप्टेंबर 1973मध्ये त्याचा जन्म मुंबईमध्ये झाला.
राम कपूरला एक अभिनेता म्हणून लोकप्रियता आणि ओळख 2006मध्ये प्रसारित होणा-या 'कसम से' मालिकेतून मिळाली. एकता कपूरच्या या मालिकेत राम जय वालियाच्या भूमिकेत दिसला होता. तेव्हापासून तो टीव्ही क्वीन एकता कपूरचा आवडता अभिनेता आहे.

2011मध्ये एकता कपूरच्या 'बडे अच्छे लगते है' मालिकेत 40 वर्षांच्या अविवाहित पुरुषाची भूमिका त्याने उत्कृष्ट साकारली होती. या मालिकेतून राम पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र तो पहिल्यासारखा स्लिम दिसला नाही. 20 वर्षांपूर्वी राम कपूरसुध्दा खूप स्लिम होता. मात्र गेल्या काही वर्षांत त्याच्यातील बदल स्पष्ट दिसून येतो.
तुम्हाला वरील छायाचित्र पाहूनच त्याचा अंदाजा आला असेलच, की गेल्या काही वर्षांत किती बदलला राम कपूर...वाढत्या वयासोबतच त्याचे वजनदेखील वाढले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच काही अभिनेत्यांची छायाचित्रे ज्यांच्यात दिसून येतो कमालीचा बदल...