आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Kapoor’S Tantrums Might Lead Ekta To End Her Favorite Show

राम कपूरचे नखरे वाढले, मे महिन्यात बंद पडणार 'बडे अच्छे लगते हैं'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता राम कपूरला खरी प्रसिद्धी एकता कपूरच्या 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेमुळे मिळाली असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. गेल्या तीन वर्षांपासून राम कपूर या मालिकेत काम करत आहे. या मालिकेची लोकप्रियता एवढी आहे, की राम सध्याचा छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे. आता बातमी आहे, की राम कपूर आणि या मालिकेची निर्माती एकता कपूर यांच्यात सध्या ऑल इज वेल नाहीये. सूत्रांच्या मते, एकता राम कपूरवर नाराज आहे. यामागे अनेक कारणे आहेत.
यापैकी एक कारण म्हणजे रामने एकताला 'शादी के साइड इफेक्ट्स' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तारखा दिल्या नव्हत्या. राम कपूर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभागी व्हावा, अशी एकताची इच्छा होती. अखेर सिनेमा रिलीज झाला आणि काळानुसार दोघांमध्ये दुरावाही निर्माण झाला.
अलीकडेच 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेच्या सेटवरसुद्धा राम नखरे दाखवत असल्याचे कळते. राम कपूरने शूट करण्यास नकार दिला असल्याचे ऐकिवात आहे. इतकेच नाही तर राम कपूरने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णयसुद्धा घेतला असल्याचे समजते.
राम कपूर शूट करताना रुची दाखवत नाही, त्यामुळे साक्षी तन्वरसोबतची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाहीये. त्यामुळे शोचा टीआरपी बराच खाली आला आहे. या स्टेजवर आल्यानंतर आता राम कपूरला रिप्लेक्स करणे शक्य नाहीये, त्यामुळे एकता कपूर आता ही मालिका बंद करण्याच्या विचारात आहे.
या मालिकेने छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली होती. ही मालिका टीआरपीमध्ये टॉप रेटेडमध्ये होती. मात्र काही महिन्यांनी या मालिकेचा टीआरपी घसरु लागला आणि आता ही मालिकाच बंद करण्याची वेळ एकतावर आली आहे. यावर्षी मे महिन्यात ही मालिका बंद होणार आहे. मे 2011मध्ये ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती.