आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर नाही, आता हे बनू शकतात 'बिग बॉस 8'चे होस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूरने 'बिग बॉस' या वादग्रस्त शोच्या आठव्या पर्वाच्या होस्टिंगच्या ऑफरला नकार दिला आहे. दिर्घकाळापासून चर्चा होती, की रणबीर कपूर 'बिग बॉस 8'चे होस्टिंग करणार आहे. परंतु रणबीरने स्वत: या गोष्टीला नाकारले आहे.
'बिग बॉस' या शोच्या मागील चार पर्वाचे सलमान खान होस्टिंग करत होता. परंतु यावेळी त्याने या पर्वाला होस्ट करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर शोचे होस्टिंग कोण करणार यामध्ये रणबीरचे नाव सर्वात पुढे होते.
तसे पाहता बॉलिवूडमध्ये चर्चा आहे, की 'बिग बॉस'चा निर्माता शोच्या आठव्या पर्वासाठी सलमानला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सलमान त्याच्या निर्णयावर ठाम आहे. तसेच शोच्या आठव्या पर्वासाठी रणबीर कपूरसोबत बातचीत केली आहे. परंतु 'बिग बॉस'मध्ये होणा-या वादामुळे त्याला शोची होस्टिंग करण्यात रुची नाही असे सांगितले जात आहे.
आता 'बिग बॉस'चे नवीन पर्व होस्ट करण्यासाठी शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह, आणि हृतिक रोशन यांच्यासोबतसुध्दा बातचबत केली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण-कोणते बॉलिवूड स्टार्सनी केले आहे 'बिग बॉस'चे होस्टिंग...?