आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिलेत का संस्कारी बाबुजींचे हे 14 PHOTOS, व्हाल आवाक्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बुनियाद' (1986), 'वो रहने वाली महलों की' (2005) आणि 'यहा मैं घर-घर खेली' (2009-12) सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलेले 'संस्कारी बाबुजी' म्हणजेच आलोकनाथ 61 वर्षांचे झाले आहेत. 10 जुलै 1956 ला दिल्लीमध्ये जन्मलेल्या आलोक नाथ यांनी सुमारे 36 वर्षांच्या करिअरमध्ये कधी 'गांधी' (1982) चित्रपटात तय्यब मोहम्मदची भूमिका केली तर, कधी 'सारांश' (1984) मध्ये पंडितची तर कधी 'बुनियाद' मालिकेत मास्टर हवेलीरामची भूमिका करताना दिसले. लोकांच्या मनात मात्र त्यांच्या संस्कारी बाबुजीची प्रतिमा घट्ट झाली आहे. 

टीव्हीवर सर्वात आधी बनले बाबुजी.. 
- आलोकनाथ यांची बाबुजीची प्रतिमान राजश्री प्रोडक्शनच्या 'मैंने प्यार किया'(1989) चित्रपटापासून तयार झाली. या चित्रपटात त्यांना भाग्यश्रीच्या वडिलांची भूमिका केली होती. 
- पण त्याच्या सुमारे 9 वर्षांआधी दूरदर्शनचा शो 'रिश्ते-नाते'मध्ये ते बाबुजीच्या भूमिकेत त्यांनी लोकांना एंटरटेन केले होते. 
- टीव्ही वरील'दाने अनार के', 'कभी कभी' (1997), 'रिश्ते' (1999-2000), 'वो रहने वाली महलो की' (2005) आणि 'तू मेरे अगल बगल है' (2014) सारख्या मालिकांतही त्यांना बाबुजीची भूमिका केली. 
- तर 'मैने प्यार किया'नंतर 'हम आपके हैं कौन', 'हम साथ-साथ है', 'विवाह' आणि 'एक विवाह ऐसा भी' अशा अनेक चित्रपटांत ते वडिलांच्या भूमिकेत दिसले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आलोकनाथ यांचे आणखी 13 Rare फोटोज...
बातम्या आणखी आहेत...