आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-यापासून विभक्त झाल्यानंतर आता 10 वर्षांनी लहान अॅक्टरला डेट करतेय ही TV अॅक्ट्रेस!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'उतरन' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रश्मी देसाई तिचा नवरा नंदीश संधूपासून विभक्त झाली आहे. नव-यापासून विभक्त झाल्यानंतर आता रश्मीला पुन्हा एकदा नव्याने प्रेम गवसलेले दिसतेय. होय, मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी याकाळात मॉडेल आणि अॅक्टर लक्ष्य लालवानीला डेट करत आहे. रश्मीने तिचे आणि लक्ष्यचे एक छायाचित्र इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. नंदीश आणि रश्मीचे फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न झाले होते. 'उतरन'च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. येथून दोघे प्रेमात पडले आणि लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र लवकरच दोघांचे नाते संपुष्टात आले.

रश्मीपेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे तिचा नवा बॉयफ्रेंड...
रश्मीचा बॉयफ्रेंड लक्ष्य तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे. रश्मी 30 वर्षांची तर लक्ष्य केवळ 20 वर्षांचा आहे. रश्मीला मात्र त्यांच्या वयातील अंतरामुळे काहीच फरक पडत नाही. दोघेही एकत्र आनंदी दिसत आहेत. एका संकेतस्थळाला रश्मीच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रश्मी आणि लक्ष्यची पहिली भेट 'अधुरी कहानी हमारी' या मालिकेच्या सेटवर झाली होती. हळूहळू दोघे जवळ आले. शूटिंगच्या फावल्या वेळेत दोघे मेकअप रुममध्ये बराच वेळ एकत्र घालवताना अनेकदा दिसले. दोघांनी मात्र अद्याप आपल्या नात्याची
सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही.

रश्मीने ही बातमी नाकारत लक्ष्य माझा केवळ चांगला मित्र असल्याचे म्हटले आहे. मी माझ्या खासगी आयुष्याविषयी कुणाला काही कशाला सांगू. हे माझे सोशल अकाउंट आहे, त्यावर मी कुणाचाही फोटो लावू शकते. पण मला लवकरच माझे सोशल मीडिया अकाउंट बंद करावे लागले, असे दिसतेय. तुमच्याप्रमाणेच अनेक जण माझ्या आणि लक्ष्यविषयी बोलत आहेत. लक्ष्य माझा केवळ चांगला मित्र आहे, असे रश्मी म्हणाली.

पुढील स्लाईड्सवर बघा, रश्मी आणि लक्ष्यचे काही PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...