आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये अशी आहे ही अॅक्ट्रेस, शॉट्स घालून पोहोचली होती पूजा करायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटणा: 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजे' फेम बिहारमधील पटणाची अभिनेत्री रतन राजपूत रिअल लाइफमध्ये खूप वेगळी आहे. छठ पूजेदरम्यान ती सूर्याला जल अर्पण करण्यासाठी जिन्स (शॉट्स) परिधान करून गंगा घाटावर पोहोचली होती. शोमध्ये एका ग्रामीण भागातील तरुणीची भूमिका साकारलेली रतन खासगी आयुष्यात खूप बिनधास्त आहे. रतनने मालिकेत बरेच दिवस गावात घालवले, मात्र ख-या आयुष्यात ती दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त राहिली नाही. कधीच अनवाणी चालली नाही. तरीदेखील तिने मालिकेतील 'लाली'ची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती.
म्हणाली होती, 'कॉल गर्लची भूमिका करायची आहे'...
- रतनने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिला कॉल गर्लची भूमिका करण्याची इच्छा आहे.
- ती म्हणाली होती, की या भूमिकेचे काही रुप असे आहेत, ज्याच्याशी लोक अज्ञात आहेत.
- रतनच्या सांगण्यानुसार, संधी मिळताच ती ही भूमिका साकारेल. वेश्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यास मदत करेल, ज्याविषयी लोक अद्यापही अज्ञात आहेत.
2015मध्ये छठ पूजेसाठी पटणाला येऊ शकली नव्हती...
- रतन जेव्हा छठ पूजेसाठी घरी यायची, तेव्हा दरवर्षी छठ पूजेच्या दिवसी सूर्याला जल अर्पण करत होती.
- मात्र, रतनची चर्चा छठ पूजेपेक्षा जास्त तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे व्हायची.
- या ट्रॅडिशनल सणाला स्त्रिया साड्यांमध्ये दिसतात, परंतु रतन अनेकदा शॉट्समध्ये सूर्याला जल अर्पण करत होती.
अशी आहे फॅमिली...
- रतनला पाच बहिणी आणि भाऊ शशांक आहे. सुनीता, किरण, सीमा, रागिनी रतनपेक्षा मोठी आहे.
- रतन समस्तीपूर जिल्ह्यातील बशिनपूर बेरी गावातील रहिवासी आहे.
- रतनचे वडील श्रीरामरतन सिंह राज्य सरकारच्या संयुक्त सचिव पदावर कार्यरत होते, ते आता निवृत्त झाले आहेत.
- सध्या, तिचे कुटुंबीय पटणा आनंदपूरी स्थित अपार्टमेंटमध्ये राहतात.
अशी पोहोचली मुंबईत...
- रतनचे शिक्षण मेरठमध्ये झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन बहीण सीमा चौहानकडे (फॅनश डिझाइनर) दिल्लीला गेली.
- रतनला बालपणीपासून अभिनयाचा छंद होता, परंतु अभिनयात करिअर करण्याविषयी तिने कधीच विचार केला नव्हता.
- दिल्लीला येऊन थिएटर गुरु सुरेंद्र शर्मा यांच्या दिग्दर्शनात रतनने थिएटरमध्ये 'निर्मला' आणि 'मैला आंचल' नाटकात काम केले.
- त्यानंतर सुरेंद्र शर्मा यांनी तिला मुंबईला जाऊन नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. परंतु रतनने त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही.
- एकदा ती मुंबई फिरण्यासाठी गेली आणि एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
- दिल्लीत राहून लेख टंडनच्या दिग्दर्शनात रतनने 'बडा आदमी' मालिकेतील पायलट एपिसोडमध्ये काम केले.
- त्यादरम्यान तिने मनीषा गोस्वामीच्या प्रॉडक्शन कंपनी 'सिद्धांत सिनेविजन'मध्ये 'हाऊज दॅट'मध्ये काम केले.
- त्यानंतर तिने एनडीटीव्ही इमॅजिनच्या 'राधा की बेटीया कुछ कर दिखाएगी' मालिकेत तिसरी मुलगी रुचीचे पात्री साकारले होते.
रतनच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट...
'राधा की बेटीया कुछ कर दिखाएगी' मालिका बंद होणात होती, त्याचवेळी तिला 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' मालिकेच्या कास्टिंग डायरेक्टर विकासचा फोन आला. त्याने तिला विचारले, की बिहारी बॅकग्राऊंडवर आधारित मालिकेत काम करशील? आणि ही मालिका रतनच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रतनचे खासगी आयुष्यातील ग्लॅमरस PHOTOS....