आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड अंदाज आणि अफेअर्समुळे एकवटते चर्चा, ही आहे TVची ग्लॅमरस अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सपना बाबुल का...बिदाई' आणि 'राम मिलाये जोडी'सारख्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली टीव्ही अभिनेत्री सारा खानने शनिवारी (6 ऑगस्ट) 25वा वाढदिवस साजरा केला. 6 ऑगस्ट 1989 रोजी साराचा जन्म मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला.
साराने मॉडेलिंग आणि अभिनयच्या जगात पाय ठेवण्यापूर्वी दूरदर्शन (मध्यप्रदेश) आणि ईटीव्हीसाठी अँकरिंग केलेली आहे. स्टार प्लसच्या 'सपना बाबुल का...बिदाई' मालिकेतून साराने अभिनय करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती डेली सोप 'राम मिलाई जोडी', 'वी द सीरिअल', 'एन्काऊंटर'मध्ये दिसली.
आज आम्ही तुम्हाला कधी बोल्ड अंदाजासाठी तर कधी आपल्या अफेअर्ससाठी चर्चेत राहणा-या सारा खानविषयी सांगत आहे...
2007मध्ये मिस भोपाळचा ताज डोक्यावर सजवल्यानंतर साराने काही न्यूज चॅनलसाठी अँकरिंगसुध्दा केली. ब्रज भूषणच्या 'मिडसमर मिडनाइट मुंबई'मधून साराने सिनेमांत पाऊल ठेवले. या सिनेमात तिने बोल्ड सीन्ससुध्दा दिले होते. या बोल्ड सीन्सने तिने खूप चर्चा एकवटली होती. मात्र भोपाळमध्ये तिला विरोधाचा सामना करावा लागला. अलीकडेच इमरान हाश्मी आणि विद्या बालन स्टारर 'हमारी अधूरी कहानी' सिनेमातसुध्दा सारा झळकली.
लग्नावर वाद
2010मध्ये सारा खानने 'बिग बॉस 4'दरम्यान स्पर्धक अली मर्चंटसह लग्नगाठीत अडकली होती. तेव्हा ती वादाच्या भोव-यात अडकली होती. मात्र एकाच वर्षात त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले. त्यानंतर दोघांच्या जवळच्या मित्रांनी खुलासा केला होता, की लग्नासाठी त्यांना 50 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र चॅनलने या गोष्टीला स्पष्ट नकारत सांगितले होते, की हे लग्न सारा आणि अली यांच्या सहमतीने लावले होते. तसेच, अली मर्चंटने 'सच का सामना' या टीव्ही शोमध्ये सांगितले होते, की त्यांनी पब्लिसिटीसाठी हे लग्न केले होते. त्याच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चुक होती.
आतापर्यंत या शोमध्ये झळकली आहे सारा:
'सपना बाबुल का... बिदाई' (2007-2010)
टीव्ही शो 'बिग बॉस-4' (2010, कंटेस्टेंट)
'राम मिलाये जोडी' (2012-2013)
टीव्ही शो 'वेलकम -बाजी मेहमान-नवाजी की' (2013, कन्टेस्टेंट)
'एन्काऊंटर' (2014)
या सिनेमांमध्ये केले काम:
'टोटल सियापा' (2014)
एम3- मिडसमर मिडनाइट मुंबई (2014)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साराच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदा...
बातम्या आणखी आहेत...