आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MMS स्कँडलमध्ये अडकली होती ही अॅक्ट्रेस, आता वयाच्या 35व्या वर्षीही लग्नासाठी नाही तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: डेब्यू शो 'जस्सी जैसी कोई नहीं'द्वारे अॅक्ट्रेस मोना सिंह प्रेक्षकांची फेव्हरेट बनली. सध्या मोना 'कवच... काली शक्तियों से' या मालिकेत धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसतेय. या मालिकेतील तिचा को-स्टार विवेक दाहियाने याचवर्षी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबच लग्न केले आहे. मात्र 35 वर्षीय मोना अद्याप लग्नासाठी तयार नाही. या कारणामुळे अद्याप सिंगल आहे मोना...

8 ऑक्टोबर, 1981 रोजी जन्मलेली मोना सिंहने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतीली तिचे जास्तीत जास्त मित्र आता विवाहित आहेच. मात्र मोना तिच्या बॅचलर लाइफत आनंदी आहे. तिला लग्नाची मुळीच घाई नाही. अलीकडेच TOI ला दिलेल्या मुलाखतीत मोनाने सांगितले, "मी खूप आनंदी आहे. माझे पर्सनल लाइफ अतिशय रॉकिंग सुरु आहे. माझ्या To-do-list मध्ये नक्कीच लग्न आहे. मात्र लग्न माझी प्रायोरिटी नाही" आणखी एका मुलाखतीत मोनाने सांगितले, "नक्कीच मलाही लग्न करायचे आहेत. पण लग्नासाठी मी आतुर झालेली नाही. माझे आईवडील माझ्या काम आणि इन्डिपेंडन्मुळे आनंदी आहेत. लग्न हेच आयुष्यात सर्वस्व नाही. मी अशा मुलींनासुद्धा पाहिलंय, ज्या काम सोडून लग्नाची वाट बघत बसल्या आहेत. शिवाय मुलींना ओझे समजणा-या आईवडिलांनासुद्धा मी पाहिले आहे. "
MMS स्कँडलनंतर अभिनेत्यासोबत झाले ब्रेकअप
चार वर्षांपूर्वी मोना तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाला सामोरे गेली आहे. 2012 मध्ये ऑनलाइन लीक झालेल्या एका बनावट MMS क्‍लिपने तिचे आयुष्यच बदलून गेले. हा एमएमएस लीक करणे मोना सिंहचा पब्लिसिटी स्‍टंट होता, असे म्हटले गेले होते. मोना बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालसोबत 2011पासून रिलेशनशिपमध्ये होती. बातम्यांनुसार, दोघे लग्नही करणार होते. मात्र सार्वजनिकरित्या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. वर्षभरानंतर मोनाचा बनावट एमएमएस लीक झाल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मोनाच्या MMS कॉन्ट्रोव्हर्सीचा परिणाम दोघांच्या नात्यावर पडला होता.

या शोजमुळे झाली प्रसिद्ध
जस्सी जैसी कोई नहीं (2003-06) नंतर मोना राधा की बेटियां कुछ कर दिखाएगी (2008-09), क्या हुआ तेरा वादा (2012-13), प्यार को हो जाने दो (2015-16), कवच.. काला शक्तियों से (2016) या डेली सोप्समध्ये झळकली. ती 'झलक दिखला जा' सीझन 1ची विजेती आहे. अनेक शोज होस्ट करण्यासोबतच मोना 3 इडियट्स (2009), उट पतंग (2011), जेड प्लस (2014) या सिनेमांमध्येही झळकली. सध्या मोना 'कवच'सोबत कृष्णा अभिषेक आणि भारती सिंहच्या 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या शोमध्ये झळकत आहे.

मोना तिचे खासगी आयुष्य कसे एन्जॉय करते, हे दाखवणारी छायाचित्रे बघा, पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...