आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Families Of The Characters Of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah'

Twins चे वडील आहेत 'बाबूजी', पाहा 'तारक मेहता..'च्या स्टार्सच्या Real Families

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे चंपकलाल उर्फ अमित भट पत्नी कृती भट आणि जुळी मुले दीप आणि देवसोबत. - Divya Marathi
फाइल फोटो: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे चंपकलाल उर्फ अमित भट पत्नी कृती भट आणि जुळी मुले दीप आणि देवसोबत.

मुंबईः सब टीव्ही वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया बेन उर्फ अभिनेत्री दिशा वाकाणी अलीकडेच विवाहबद्ध झाली. 24 नोव्हेंबर रोजी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट मयूर परीहा यांच्यासोबत दिशा लग्नाच्या बेडीत अडकली. गुरुवारी (26 नोव्हेंबर) रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले.
28 जुलै 2008 रोजी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला एपिसोड ऑन एअर झाला होता. ही मालिका एक इतिहास रचेल, असा विचारही त्यावेळी कुणी केला नसावा. ही कदाचित पहिलीच भारतीय विनोदी मालिका असावी, जी गेल्या सात वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे 1800 एपिसोड्स ऑन एअर झाले आहेत.
या प्रसिद्ध मालिकेतील ऑनस्क्रिन कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. मात्र मालिकेतील या कलाकारांच्या रिअल लाइफ फॅमिलीला प्रेक्षक ओळखत नाहीत. मालिकेत चंपकलाल ही भूमिका वठवणारे अभिनेते अमित भट ख-या आयुष्यात जुळ्या मुलांचे वडील असल्याचे, फार कमी जणांना ठाऊक आहे. देव आणि दीप ही त्यांच्या जुळ्या मुलांची नावे आहेत. या खास पॅकेजमधून divyamarathi.com वाचकांना जेठालाल, दयाबेन, माधवी भिडे आणि तारक मेहतासह या मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाइफ कुटुंबीयांची खास छायाचित्रे दाखवत आहे.
'तारक मेहता...'च्या स्टारकास्टच्या रिअल फॅमिली मेंबर्सना बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...