आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Hanuman Of Indian TV Industry In Divya Marathi

PHOTO: यांच्या रुपाने भारतीयांना दिसला \'हनुमान\', टीव्हीवर येताच पडत होते पाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुर्वी रामायण जेव्हा टीव्हीवर लागायते तेव्हा संपूर्ण शहरभर कर्फ्यू लागल्याप्रमाणे दिसायचे. लोक टीव्हीची पुजा करत, तर राम, सीता, हनुमान स्क्रीनवर आले की त्यांच्या लोक पाया पडत. रामायणामध्ये सर्वात लक्षात राहिलेले पात्र म्हणजे राम आणि हनुमानाचे. रामाची भूमिका अरूण गोविल तर हनुमानाची भूमिका दारा सिंग यांनी पार पाडली होती. विशेष म्हणजे त्यानंतर अनेक दशके दारासिंग यांना हनुमान अशीच ओळख होती. भारतीय लोकांना पहिला हनुमान दारासिंग यांच्याच रुपाने पाहायला मिळाला होता. कारण हनुमानाची पुराणकथेत जी काही शरीररचना सांगण्यात आली होती. ती दारासिंग यांच्या शरिरयष्ठीसोबत तंतोतंत जुळत होती. त्यामुळेच काय ते लोकांना दारासिंग यांच्यामध्ये साक्षात हनुमान दिसायचे. आज हनुमान जयंती निमित्त आम्ही दारासिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आहोत. 
 
गाव धरमूचक, जिल्हा अमृतसर. या छोट्या गावात जन्मलेला एक मुलगा पुढे जाऊन कुस्ती विश्वातील चॅम्पीयन बनेल असा कोणी विचार सुध्दा केला नव्हता. १९ नोव्हेंबर १९२८ साली या गावातील सौ. बलवन्त कौर व श्री सूरत सिंग यांच्या कुटुंबात एक सामान्य मुलाने जन्म घेतला आणि जगाच्या कुस्ती विश्वात एक नवीन इतिहासाला सुरुवात झाली. दारासिंग नाव असलेल्या ह्या मुलाचे लग्न त्याच्या घरच्यांनी लहान वयातच एका मोठ्या मुलीशी लावून दिले. आपला मुलगा लवकर तरुण व्हावा ह्यासाठी त्याची आई त्याला रोज बदाम लोणी, तसेच म्हशीचे दूध प्यायला देत होती. या मुळे हा बालक फक्त सतरा वर्षाच्या कुमारवयातच प्रद्यूम्न नावाच्या मुलाचा बाप बनला. दारासिंग यांना आणखीन एक छोटा भाऊ होता. त्याचे नाव सरदारासिंग. सर्व लोक त्याला रंधवा म्हणून ओळखायचे. या दोन्ही भावांना वेड होते पहिलवानीचे. गावात तसेच मेळ्यात कुस्त्यांमध्ये विजय मिळवत त्यांनी शहरातही आपल्या विजयाची पताका रोवली व आपल्या गावाचे नाव प्रकाशझोतात आणण्यास सुरुवात केली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, दारासिंग यांचा संपूर्ण जीवन प्रवास...