आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REAL LIFE मध्ये असते दिसतात TV चे राम-सीता, पाहा इतर स्टारकास्ट कशी दिसते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुण गोविल आणि दीपिका चिखालिया - Divya Marathi
अरुण गोविल आणि दीपिका चिखालिया

मुंबईः रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' मालिकेचा विषय निघताच, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावण यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. या मालिकेत अभिनेता अरुण गोविल यांनी भगवान श्रीरामाची भूमिका साकारुन भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली होती. तर दिवंगत अभिनेते दारा सिंग यांनी हनुमान बनून आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेला रावण आजही लोक विसरु शकलेले नाहीत.
25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 या काळात प्रसारित झालेली ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. ही मालिका संपून 26 वर्षांचा काळ लोटला आहे. 'रामायण' ही मालिका नवीन कलाकारांसोबत नव्या संचात आणि ग्लॅमरसोबत अनेकदा टेलिव्हिजनवर दाखल झाली आहे. मात्र पहिल्या 'रामायण'ची सर इतर कुठल्याही मालिकेला येऊ शकली नाही.
रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये काम केलेल्या स्टार्सची जुनी छवी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. मात्र एवढ्या वर्षांत या मालिकेतील कलाकारांच्या चेह-यात बराच बदल झाला आहे. यापैकी काही कलाकार आज या जगात नाहीत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रामायणमधील कलाकारांच्या चेह-यात झालेला बदल दाखवत आहोत. वरील छायाचित्रात अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखालिया दिसत असून त्यांनी मालिकेत राम आणि सीतेची भूमिका वठवली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रामानंद सागर यांच्या 'रामायण'मधील इतर कलाकारांची छायाचित्रे...
नोटः 'रामायण' या मालिकेतील काही स्टार्सचे निधन झाले आहे, मात्र लोकांच्या मनात आजही त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अगदी ताज्या आहेत. त्यामुळे या पॅकेजमध्ये आम्ही त्यांचाही समावेश केला आहे.