आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS:रिअल लाइफमध्ये अशी दिसते \'जोधा अकबर\'मधली \'जोधा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित 'जोधा अकबर' या मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. अलीकडेच आलेल्या बातम्यांनुसार, महाराणी जोधाची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिधी शर्मा ही मालिका सोडण्याच्या विचारात आहे. याचे कारण मालिकेच्या दिग्दर्शकासोबत असलेले मतभेद सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकबरची भूमिका साकारणारा अभिनेता रजत टोकस, दिग्दर्शक संतराम वर्माचा चांगला मित्र आहे. मात्र परिधी आणि दिग्दर्शकात सर्वकाही आलबेल नाहीये, त्यामुळे शूटिंगदरम्यान अडचणी निर्माण होत आहेत.
संतराम, परिधीला कोणत्याही वेळी शुटिंगसाठी बोलावतात आणि बराच वेळ वाट पाहायला लावतात. जोपर्यंत एकता कपूर या शोची निर्माती होती, तोपर्यंत परिधीने ही अडचण कुणापुढेही मांडली नव्हती. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून परिधीने शोमधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या भूमिकेसाठी तब्बल 7000 मुलींचे ऑडीशन्स घेण्यात आले होते. आठ महिने ऑडीशन प्रक्रिया झाल्यानंतर परिधीला जोधाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले.
ही परिधीची तिसरी मालिका आहे. यापूर्वी दोन मालिकांमध्ये ती झळकली आहे. 2009 मध्ये आलेल्या तेरे मेरे सपने या मालिकेत तिने मीराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती 2011 मध्ये रुक जाना नहीं या मालिकेत लीड रोलमध्ये असलेल्या पूजा शर्माच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिने साकारलेल्या पात्राचे नाव महक होते.
छोट्या पडद्यावरची ही प्रसिद्ध अभिनेत्री विवाहित असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. परिधीने आपल्या लग्नाविषयी गुप्तता बाळगली होती. मात्र इंटरनेटवर तिच्या खासगी आयुष्याविषयीची माहिती उपलब्ध आहे. या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी परिधीचे लग्न झाले आहे. तिच्या पतीचे नाव तन्मय सक्सेना असून तो अहमदाबादमध्ये वास्तव्याला आहे. प्रॉडक्शन हाऊसच्यावतीने लग्नाविषयी मौन बाळगण्याचा आदेश परिधी देण्यात आला असावा, असे म्हटले जाते. वरील छायाचित्रात परिधी तिच्या पतीसह दिसत आहे.
आजवर तुम्ही परिधीला प‍डद्यावर नटून थटून पाहिले आहे. मात्र खासगी आयुष्यात तिचे राहणीमान खूप साधे आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या तिच्या छायाचित्रांतून दिसून येतं. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला परिधीची खासगी आयुष्याची खास झलक दाखवत आहोत.