आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अल्लाह मियां'... ही तर 'कुबूल है'मधील जोया आहे, पाहा खास PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी 'कुबूल है' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ही मालिका जोया फारुखी या तरुणीच्या आयुष्यावर आधारित आहे. अमेरिकेहून ही तरुणी भोपाळमध्ये आपल्या वडिलांच्या शोधासाठी येते. या शोधादरम्यान तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एकीकडे आपल्या वडिलांच्या विरहाचे दुःख तिच्या मनात असते, तर दुसरीकडे आपल्या चंचल स्वभावामुळे ती लोकांना हैराणसुद्धा करते. जोयाची ही भूमिका साकारत आहे अभिनेत्री सुरभी ज्याती.
जाणून घेऊया तिच्याविषयी...
कोण आहे सुरभी ज्योती-
सुरभी ज्योती टीव्ही अभिनेत्री असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र ती एक रंगभूमी कलाकारसुद्धा असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. सुरभी पंजाबी तरुणी आहे. तिचा जन्म जालंधर (पंजाब) मध्ये झाला. टीव्ही आणि रंगभूमीशिवाय सुरभीने पंजाबी सिनेमांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. झीटीव्ही कुबूल है या मालिकेमुळे तिला ख-या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत सुरभी सुरुवातीला जोया फारुखीच्या भूमिकेत दिसली आणि आता ती सनम अहमद खानच्या भूमिकेत दिसत आहे.
रंगभूमीपासून झाली करिअरला सुरुवात -
2007मध्ये सुरभीने रंगभूमीवर आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. त्यावेळी ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्यानंतर 2010मध्ये तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. हा एक पंजाबी शो होता आणि त्या शोचे नाव होते 'अंखियां तो दूर जाए न'. 2010-2011 या काळात सुरभीने या शोमध्ये काम केले. 2011मध्ये तिला 'कच दियां वांगा' हा दुसरा पंजाबी शो मिळाला. वर्षभर सुरभी या शोमध्ये झळकली. ऑक्टोबर 2012मध्ये तिला झी टीव्हीवरील 'कुबूल है' या मालिकेत लीड रोल मिळाला.
पंजाबी सिनेमांतही केले काम -
2010मध्ये सुरभीला पहिला पंजाबी सिनेमा मिळाला. या सिनेमाचे नाव होते 'इक कुडी पंजाब दी'. त्यानंतर 2012मध्ये 'मुंडे पटियाले दे' आणि 'रौला पे गया' या पंजाबी सिनेमात सुरभी झळकली आहे.
टीव्हीवर तुम्ही जोया उर्फ सुरभीला 'अल्लाह मियां' आणि 'मिस्टर खान, वाट्स रॉन्ग विद यू' यांसारखे संवाद बोलताना आणि नॉटी अदा दाखवताना पाहिले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला जोयाची रिअल लाइफमधील खास छायाचित्रे दाखवत आहोत.
सुरभीची खास छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...