Home »TV Guide» Real Reason Why Kapil Sharma Suddenly Introduce His Wife To World

कपिलने अचानक का शेअर केला 'पत्नी'चा Photo, समोर आले धक्कादायक कारण

दिव्य मराठी वेब टिम | Mar 20, 2017, 18:02 PM IST

मुंबई-कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील भांडणाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. सोशल मीडियातूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. कपिल शर्माला यशाची हवा लागली, असेही काहींनी म्हटले आहे. पण या भांडणापाठोपाठच कपिल शर्माच्या लग्नाची बातमीसुद्धा समोर आली आहे. लग्नाची बातमी कपिलने अगदी ठरवून दिल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? त्यामागचे कारण म्हणजे सुनील ग्रोव्हरला केलेल्या मारहाणीमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठणार हे त्याला चांगलेच ठाऊक होते. याच कारणामुळे मुंबईत दाखल होताच कपिलने मारहाणीचे प्रकरण दाबण्यासाठी आपली पत्नी म्हणून गिन्नीचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करुन सगळ्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केला.
मीडियाच्या प्रश्नांची दिली उत्तरे...
इतकेच नाही तर कुठल्याही प्रकरणावर नेहमी मौन बाळगणा-या कपिलने लग्नासंदर्भात मीडियाच्या अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरेसुद्धा दिली. पण तोपर्यंत मारहाणीचे प्रकरण उघड झाले होते. दरम्यान कपिलची अतिशय जवळची मैत्रीण प्रीतीनेसुद्धा कपिलचे फोटोज पोस्ट केले. जेणेकरुन तिच्या आणि कपिलच्या नात्याविषयी चर्चा व्हावी. पण एवढे करुनसुद्धा सगळ्यांच्या नजरा मारहाणीच्या प्रकरणाकडे लागल्या.
फ्लाइटच्या क्रू मेंबर्सनी सांगितली संपूर्ण घटना...
कपिलवर आरोप आहे, की त्याने त्याच्या सहकलाकारांसोबत केवळ बाचाबाचीच केली नाही, तर त्यांच्यावर हातसुद्धा उगारला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, कपिलच्या इतर सहकलाकारांनी मध्यस्थी करुन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. नाही तर हे प्रकरण खूप पुढे गेले असते. खरं तर आतापर्यंत मारहाणीची बातमी अफवा असल्याचे अनेकांचे मत झाले होते. पण dainikbhaskar.com ने फ्लाइटच्या क्रू मेंबर्ससोबत बातचीत केली. यावेळी त्यांनी तेथे घडलेली संपूर्ण घटना सांगितली. ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडली होती. कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसोबत ऑस्ट्रेलियाहून दिल्ली मार्गे मुंबईला परतत होता.
पेसेंजर्सवर भडकला कपिल...
एअरइंडियाच्या कर्मचार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे, कपिलने फ्लाइटमध्ये एंट्री केली तेव्हा त्याचा मूड खराब होता. कपिल शर्माला फ्लाइटमध्ये दूसर्‍या पॅसेंजर्सने विश केले. त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कपिलने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इतकेच नाही तर एका 9 वर्षाच्या मुलीने कपिलसोबत सेल्फी घेतली असता कपिलने तिच्यावर मोठ्या आवाजात ओरडला. कपिलच्या अशा वागण्याने पॅसेंजर्सनी आश्चर्य व्यक्त केले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, आणखी काय सांगितले क्रू मेंबर्स यांनी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended