आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recently In The House Of Bigg Boss 8, Ali Quili Mirza Advised Dimpy Mahajan To Rethink About Her Relationship With Rahul Mahajan

राहूल महाजनला पाहून डिम्पी झाली होती भावूक, एकेकाळी इतके रोमँटिक होते दोघे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच, 'बिग बॉस'च्या घरात राहूल महाजनसुध्दा पोहोचला होता. डिम्पी आणि राहूल यांच्या सर्वांच्या नजरा टिकून होत्या. परंतु दोघांमध्ये कोणतेच खास रिअॅक्शन दिसले नाही. पार्टी संपल्यानंतर राहूलला घरातून बाहेर जायचे होते तेव्हा डिम्पीचे डोळे भरून आले. ती खूपच भावूक झालेला दिसली. राहूलने तिला घरात एका मजबूत संपर्धकासारखे खेळण्याचा सल्ला देऊन निघून गेला.
2014मध्येच दोघांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी 2010मध्ये धूमधडाक्यात लग्न करून एकमेकांना एका रिअॅलिटी शोमध्ये स्वीकारले होते. परंतु लग्नाच्या चार महिन्यांनी डिम्पीने राहूलवर कौंटुबिक हिंसेचा आरोप लावला होता. मधल्या काळात डिम्पी आणि दुबईचा रहिवासी एका इव्हेंट मॅनेजमेन्ट कंपनीच्या मालकाची जवळीक वाढल्याच्या बातम्या आल्या होत्या.
यापूर्वी राहूल आणि डिम्पी नच बलिए 5मध्ये दिसले होते. आता दोघांनी घटस्फोट घेऊन एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. परंतु बिग बॉसच्या अलीकडेच झालेल्या एपिसोडमध्ये डायंड्राने राहूलला किस केल्यानंतर डिम्पीला ते खटकले. नंतर अलीसुध्दा डिम्पीला म्हणाली, की तुमच्या दोघांमध्ये आजही एकमेकांबद्दल भावना आहेत.
एकेकाळी प्रेमानी एकत्र राहणारी ही जोडी सध्या विभक्त झाली आहे. राहूल आणि डिम्पी यांची रोमँटिक छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...