आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दया भाभी\'च्या रिसेप्शनमध्ये पत्नीसोबत दिसले \'बाबूजी\', पोहोचले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - मयूर परीहा आणि दिशा वाकाणी, रिसेप्शनमध्ये पत्नीसोबत अमित भट - Divya Marathi
डावीकडे - मयूर परीहा आणि दिशा वाकाणी, रिसेप्शनमध्ये पत्नीसोबत अमित भट

मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतील दया भाभी उर्फ अभिनेत्री दिशा वाकाणीने गुरुवारी आपल्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. यावेळी दिशाला शुभेच्छा देण्यासाठी तिचे ऑनस्क्रिन सासरे बाबूजी चंपकलला जयंतीलाल गडा उर्फ अभिनेता अमित भट आपल्या पत्नीसोबत पोहोचले.
केवळ अमित भटच नव्हे तर मालिकेतील इतर स्टारकास्टसुद्धा आपल्या लाडक्या अभिनेत्रीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला आवर्जुन हजर होते. तारक मेहता (शैलेश लोढा), माधवी भिडे (सोनालिका जोशी), सोनू (निधी भानुशाली), रोशन सिंह सोढी (गुरुचरण सिंह) आणि पत्रकार पोपटलाल (श्याम पाठक) सह सर्वच आपापल्या रिअल फॅमिलीसोबत येथे पोहोचले होते.
24 नोव्हेंबर रोजी दिशा वाकाणी मुंबईस्थित चार्टर्ड अकाउंटंट मयूर परीहासोबत विवाहबद्ध झाली. लग्नात केवळ दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिशा वाकाणीच्या रिसेप्शनचे फोटोज...
सर्व फोटोजः अजीत रेडेकर