आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्शी खानबद्दल आता आईनेच केला हा खुलासा, बिग बॉसमध्ये याबद्दल सर्वांनाच खोटे सांगते मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 'बिग बॉस-11' कंटेस्टंट अर्शी खान पुन्हा एकदा नवा कॉन्ट्रव्हर्सीमुळे चर्चेत आली आहे. तिचे वय काय आहे, यावरुन वाद सुरु आहे. बिग बॉसच्या घरात तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती आधीच चर्चेत आहे. तिच्या लग्नाबद्दलही अनेकजणांची वेगवेगळी माहिती आहे. काहींचे म्हणणे आहे की तिने एका 50 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न केले होते. मात्र यावर अर्शीने खुलासा केला नाही. तिच्या वयाबद्दलही अनेकांची अनेक मतं आहेत. विशेष म्हणजे तिच्या वडिलांनीही ती खोटारडी असल्याचे म्हटले आहे. आता तिच्या आईने तिच्याबद्दलची माहिती दिली आहे. 

 

काय म्हणाली अर्शीची आई
- अर्शीच्या आईने सांगितले, की अर्शी खानला प्रसिद्धी फिल्म आणि मॉडलिंग ऐवजी कॉन्ट्रव्हर्सीमुळे मिळाली आहे. 
- अर्शीचे संपूर्ण कुटुंब भोपाळला राहाते. तिची आई नाद्राने सांगितले, की पाच बहिण-भावांमध्ये अर्शी खान सर्वात लहान आहे. 2015 मध्ये तिच्या भावाचे लग्न झाले होते, तेव्हा ती भोपाळमध्ये आली होती. 
- अर्शीच्या आईने सांगितल्यानुसार तिचे वय 26 वर्षे आहे. मात्र स्वतः अर्शीने तिच्या कागदपत्रांवर 29 जुलै 1986 ही तारीख दिलेली आहे. त्यानुसार तिचे वय 31 वर्षे 3 महिने 22 दिवस होते. 
- नाद्रा यांनी सांगितले, की पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबतचे लग्न आणि प्रेग्नेंट होण्याचा दावा अर्शीने केला होता. या प्रकरणात शाहिद आफ्रिदीला स्पष्टीकरण द्यावे लागले होते, ते पूर्णपणे चुकीचे होते. ते म्हणाले होते की ते लहानपणापासून अर्शीला ओळखतात, हा फक्त पब्लिसिटी स्टंट होता. 
- अर्शीची आई नाद्रा आणि भाऊ फरहान खान याने सांगितले, अर्शीने स्वतः एका न्यूज चॅनलला सांगितले होते की या सर्वा बातम्या खोट्या आहेत. 
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनी अर्शी मुंबईला गेली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा.. Photos

बातम्या आणखी आहेत...