आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपोर्ट्स: 2 कोटींत साइन केलाय 'बिग बॉस', रिमी सेन बनली सर्वात महागडी स्पर्धक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : रिमी सेन
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन सध्या 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक म्हणून दिसत आहे. मात्र सुरुवातीपासूनच तिला या खेळात मूळीच रुची नाहीये. विशेष म्हणजे, रिमी 'बिग बॉस'ची आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक आहे. एका इंग्रजी वेबसाइटनुसार, रिमीला जी साइनिंग अमाउंट देण्यात आली आहे, ती शोच्या प्राइज मनीपेक्षा चार पट जास्त आहे. वेबसाइटनुसार, रिमीने या शोसाठी 2 कोटी रुपये साइनिंग अमाऊंट घेतली आहे. शोचे पारितोषिक केवळ 2 कोटी आहे.
इतर स्पर्धकांनी प्रत्येक आठवड्यासाठी घेतले 3 ते 5 लाख रु.
इंग्रजी वेबसाइटनुसार, रिमी सेनला सोडून घरातील इतर सदस्यांनी प्रत्येक आठवड्यासाठी 3 ते 5 लाख रुपये घेतले आहेत. अर्थातच ज्याची लोकप्रियता सर्वात कमी आहे त्याला 3 लाख आणि जो सर्वात जास्त लोकप्रिय आहे त्याला 5 लाख रुपये प्रत्येक आठवड्यासाठी देण्यात आले. विशेष म्हणजे, शोचा अवधी जळपास 15 आठवडे आहे आणि एखादा स्पर्धक 15 आठवडे घरात टिकला तरी केवळ 75 लाख रुपयेच कमावू शकतो. यामध्ये प्राइज मनी 50 लाख रुपये जोडले तरी रिमी सेनच्या साइनिंग अमाउंटच्या रकमेची बरोबरी करू शकत नाही.
शुभोमित्रा सेन आहे रिमीचे खरे नाव-
क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की रिमी सेनचे खरे नाव शुभोमित्रा सेन आहे. तिचे जन्म 21 सप्टेंबर 1981मध्ये कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये झाला. तिने कोलकाताच्या विद्या भारती गर्ल्स कॉलेजमधून शाळेय शिक्षण आणि कोलकाताच्या यूनिव्हर्सिटीमध्ये कॉमर्समधून पदवी शिक्षण घेतले.
'कोकाकोला'च्या जाहिरातीमधून आली लाइमलाइटमध्ये-
रिमी सेन सर्वप्रथम आमिर खानच्या कोलाकोला जाहिरातीमध्ये दिसली होती. येथून तिच्यावर दिग्दर्शकाची नजर पडली आणि तिला 'Nee Thodu Kavali' हा तेलगू सिनेमा मिळाला. बॉलिवूडमध्ये तिचे पदार्पण 2003मध्ये झाले. दिग्दर्शक प्रियदर्शनच्या 'हंगामा' हा रिमीचा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. यामध्ये अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी आणि परेश रावलसुध्दा महत्वाच्या भूमिकेत होते.
नंतर तिने सलमानसोबत 'क्योकीं', अभिषेक बच्चनसोबत 'धूम 2', अजय देवगणसोबत 'गोलमाल' आणि अक्षय कुमारसोबत 'गरम मसाला'सारखे हिट सिनेमे दिले. मात्र आता ती बॉलिवूड फ्लॉप ठरत आहे. कदाचित त्याच कारणाने तिने 'बिग बॉस'मध्ये येण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिमी सेनचे खासगी आयुष्यातील काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...